Join us

कंगनाच्या सिनेमाचा प्रोड्यूसर राहिला आहे 'पंचायत'मधील उप-प्रधान, 'या' सिनेमात लावले होते पैसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2022 15:10 IST

Panchayat 2 : फैजल यांनी भूमिका जबरदस्त निभावली असली तरी त्याच्यासाठी अभिनय पॅशन नाही तर एक चॉइस आहे. मित्रांच्या सांगण्यावरून त्याने त्यांच्या प्रोजेक्ट्समध्ये अभिनय केला.

अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओवरील चर्चेत असणारी वेबसीरीज 'पंचायत' (Panchayat 2) मध्ये उप-प्रधानाच्या भूमिकेला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळत आहे. प्रल्हाद पांडे बनलेला फैजल मलिकने (Faisal Malik) आपल्या जबरदस्त अभिनयाने प्रेक्षकांसोबतच समीक्षकांनाही हैराण केलं आहे. 

फैजल यांनी भूमिका जबरदस्त निभावली असली तरी त्याच्यासाठी अभिनय पॅशन नाही तर एक चॉइस आहे. मित्रांच्या सांगण्यावरून त्याने त्यांच्या प्रोजेक्ट्समध्ये अभिनय केला. तशी तर त्याची स्वत:ची प्रॉडक्शन कंपनी आहे. 'हमारी फिल्म कंपनी' नावाने हे प्रॉडक्शन हाऊस असून ती पत्नीसोबत चालवतो.

फैसलने बॉलिवूडच्या अनेक सिनेमांची निर्मिती केली आहे. ज्यात कंगना रणौत, ऋचा चड्ढासारख्या अभिनेत्रींचे सिनेमेही आहेत. फैसलच्या प्रॉडक्शन कंपनीने अनेक टीव्ही शोज आणि सिनेमांची निर्मिती केली आहे. ज्यात रणदीप हुड्डा आणि ऋचा चड्ढाचा सिनेमा मी आणि चार्ल्स, कंगना रणौतचा सिनेमा रिवॉल्वर राणी यांचा समावेश आहे. सात उचक्के सिनेमाही त्यानेच बनवला.

इतकंच नाही तर फैजलने अनेक वेब शोजच्या स्क्रीप्ट लिहिल्या आहेत. भलेही गेल्या काही वर्षात ओटीटीचा पसारा वाढला. पण फैजलने आजपासून दहा वर्षाआधीच सीरीज लिहिली होती. फैसलने एका नव्या शो चा पायलटही तयार केला होता. पण अनेकांनी त्याला रिजेक्ट केलं.अनुराग कश्यपमुळे अभिनय

प्रॉडक्शन हाऊसमध्ये आपलं करिअर बनवत असलेला फैजल अभिनयात अपघाताने आला. गॅंग्स ऑफ वासेपूरचं प्रॉडक्शन सांभाळण्याची जबाबदारी फैजलला मिळाली होती. एक दिवस शूटिंग दरम्यान एक कलाकार अचानक पळून गेला. ज्यामुळे पूर्ण क्रू हैराण झाला होता. अशात अनुराग आणि त्याच्या बहिणीने फैजलला ती भूमिका करण्यास तयार केलं. फैजलने मैत्रीखातर रोल केलाही. पण त्याला कुठे माहीत होतं की, गॅंग्स ऑफ वासेपूरमध्ये इतके मोठे कलाकार असूनही त्याचा छोटासा पोलिसाचा रोलही लोकांच्या लक्षात राहील. 

त्यानंतर फैजल काही छोटया मोठ्या सीरीजमध्ये दिसला. पण त्याचा पूर्ण फोकस आपल्या प्रॉडक्शन कंपनीवर होता. हेच कारण होतं की, गॅंग्स ऑफ वासेपूरनंतर फैजल अभिनय करताना दिसला नाही. पंचायतचे मेकर्सही फैजलचे जवळचे मित्र आहेत. अशात त्यांनीही फैजलला उप प्रधानच्या भूमिकेसाठी तयार केलं.  

टॅग्स :बॉलिवूडसेलिब्रिटी