‘पंचायत’ (Panchayat) ही वेबसीरिज प्रेक्षकांना प्रचंड भावली. नुकताच या सीरिजचा दुसरा सीझन अर्थात ‘पंचायत 2’ (Panchayat season 2 ) रिलीज झाला. सध्या ‘पंचायत 2’ची जोरदार चर्चा आहे. या सीरिजने नुसता धुमाकूळ घातला आहे. विशेष म्हणजे,‘पंचायत 2’ रिलीज होत नाही तोच फॅन्स ‘पंचायत 3’ची प्रतीक्षा करू लागले आहेत. खास बात म्हणजे, ‘पंचायत 3’ची कथा काय असेल, याचे अंदाज बांधले जात आहेत.‘पंचायत’च्या पहिल्या सीझनमध्ये पुढील पार्टच्या कथेची हिंट देण्यात आली होती. आता ‘पंचायत 2’ पाहिल्यानंतर फॅन्स ‘पंचायत 3’च्या कथेबद्दल अंदाज बांधत आहेत. ‘पंचायत 2’च्या अखेरच्या एपिसोडमध्ये प्रल्हाद पांडेचा सीक्वेन्स दाखवला गेला.
मुलगा शहीद झाल्याने प्रल्हाद पांडे एकदम एकाकी पडला. याच एपिसोडमध्ये आमदार चंद्रकिशोर सिंग अभिषेक त्रिपाठीची फुलेरामधून बदली करण्यास सांगतो. त्यामुळे ‘पंचायत 3’ची कथा अभिषेक त्रिपाठीच्या बदलीभोवती गुंफली जाईल, अशी शक्यता आहे. तिसऱ्या सीझनमध्ये प्रधान निवडणूक दाखवली जाईल, असाही अंदाज आहे. या निवडणुकीत मंजू देवी व भूषणची पत्नी दोघींमध्ये थेट लढत होईल. आमदारासोबतचा अभिषेकचा संघर्षही तिसऱ्या सीझनमध्ये दाखवला जाऊ शकतो.
गाव सोडून जाणार अभिषेक?अभिषेक त्रिपाठी पहिल्या सीझनमध्ये परिक्षेची तयारी करताना दिसला. दुसऱ्या सीझनमध्येही तो या परिक्षेची तयारी करत असताना दाखवलं गेलं. अभिषेक ही परिक्षा उत्तीर्ण होतो का? उत्तीर्ण झाल्यास तो गाव सोडून जातो का? अशा प्रश्नांची उत्तरं या सीरिजच्या तिसऱ्या भागात मिळू शकतात. मुलाच्या मृत्यूनंतर आतून कोलमडून गेलेला प्रल्हाद पांडे पुन्हा आपल्या जुन्या अवतारात परतेल का? हेही तिसऱ्या पार्टमधून कळू शकते. पंचायतच्या दुसऱ्या सीझनमध्ये एकूण आठ एपिसोड आहेत. प्रत्येक एपिसोडमध्ये एक नवी कथा आहे. आता प्रेक्षकांना तिसºया सीझनची प्रतीक्षा आहे.