Join us

या कारणामुळे झाला होता पंकज कपूर आणि निलिमा आझमी यांचा घटस्फोट, शाहिद होता अवघ्या तीन वर्षांचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 7:00 AM

पंकज कपूर नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये शिक्षण घेत असतानाच त्यांची ओळख निलिमा आझमी यांच्यासोबत झाली होती.

ठळक मुद्देनिलिमापासून घटस्फोट झाल्यानंतर पंकज कपूर यांनी सुप्रिया पाठक यांच्याशी दुसरे लग्न केले.

पंकज कपूर यांचा आज म्हणजेच 29 मे ला वाढदिवस असून त्यांचा जन्म पंजाबमधील लुधियानामध्ये 1954 ला झाला. अभिनयाची आवड असलेल्या पंकज कपूर यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मधून अभिनयाचे शिक्षण घेतले. त्यांनी 1982 साली प्रदर्शित झालेल्या गांधी या चित्रपटाद्वारे त्यांच्या चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी मंडी, एक डॉक्टर की मौत, चमेली की शादी, एक रुका हुआ फैसला, मकबूल, फाईडिंग फॅनी यांसारख्या अनेक चित्रपटांत दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. त्याचसोबत जबान सभांल के, ऑफिस ऑफिस या त्यांच्या मालिकांना देखील लोकांनी डोक्यावर घेतले आहे. त्यांच्या अभिनयासाठी त्यांना अनेक पुरस्काराने देखील गौरवण्यात आलेले आहे.

पंकज कपूर नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये शिक्षण घेत असतानाच त्यांची ओळख निलिमा आझमी यांच्यासोबत झाली होती. निलिमा यांना प्रसिद्ध नर्तिका बनायचे होते आणि त्यासाठी त्या बिरजू महाराज यांच्याकडे नृत्याचे शिक्षण घेत होत्या. पंकज आणि निलिमा यांची ओळख होताच ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि अफेअर सुरू झाल्यानंतर केवळ एकाच वर्षांत म्हणजेच 1975 ला त्यांनी लग्न केले. त्यावेळी पंकज 21 तर निलिमा 16 वर्षांच्या होत्या. लग्नाच्या काहीच वर्षांत त्यांना पहिला मुलगा झाला. पण शाहिद या त्यांच्या मुलाच्या जन्मानंतर त्यांच्यात खटके उडायला सुरुवात झाली आणि त्यांनी शाहिद केवळ तीन वर्षांचा असताना घटस्फोट घेतला.

पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत निलिमा यांनी घटस्फोटाविषयी सांगितले होते की, ‘मला पंकज यांच्यापासून विभक्त व्हायचे नव्हते. पण ते त्यांच्या आयुष्यात खूप पुढे गेले होते. त्यांच्याकडे त्यांचे स्वत:चे एक कारण होते. आम्ही पहिल्यांदा भेटलो तेव्हा मी अवघ्या 15 वर्षांची होते आणि शाहिदच्या जन्मानंतर तीन वर्षांनी आम्ही वेगळे झालो होतो. विभक्त होण्यासाठी पंकजकडे चांगले कारण होते. मी त्यांना समजून घेण्याचा बराच प्रयत्नही केला. पण एक खरे आमचा घटस्फोट आम्हा दोघांसाठीही खूप कष्टाचा होता. आम्ही आतून पूर्णपणे तुटलो होतो. पण आज सर्वकाही ठिक आहे. ते त्यांच्या कुटुंबासोबत आनंदात आहेत. ते नेहमी आनंदात राहावे, हीच मी प्रार्थना करते.’

निलिमापासून घटस्फोट झाल्यानंतर पंकज कपूर यांनी सुप्रिया पाठक यांच्याशी दुसरे लग्न केले. या दोघांना दोन मुले आहेत. मुलाचे नाव रुहान कपूर तर मुलीच नाव सना कपूर आहे.

टॅग्स :पंकज कपूरशाहिद कपूर