Pankaj Tripathi: अभिनेते पंकज त्रिपाठी यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 'OMG 2' चित्रपटाच्या यशामुळे आनंदात असणाऱ्या पंकज त्रिपाठी यांच्या वडिलांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. पंकज यांचे वडील पंडीत बनारस तिवारी यांनी बेलसांड, या त्यांच्या मूळ गावी वयाच्या 98 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर गावातच अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणारे अभिनेते पंकज त्रिपाठी बिहारमधील गोपालगंज भागातील रहिवासी आहेत. पंकज त्रिपाठी आपल्या करिअरमुळे मुंबईत राहतात, तर त्यांचे आई-वडील गावीच राहायचे. एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत पंकज त्रिपाठी यांनी सांगितले होते की, त्यांच्या वडिलांना त्यांच्या कामात अजिबात रस नाही. पंकज चित्रपटात नेमकं काय काम करतात, हेदेखील त्यांना माहित नाही.
पंकज त्रिपाठींचे वडील एकदाच मुंबईत आलेपंकज त्रिपाठी यांनी सांगितले होते की, त्यांचे वडील फक्त एकदाच मुंबईत आले होते. इथली मोठमोठी घरं आणि इमारती त्यांना आवडत नव्हत्या. त्यांचे वडील कधीही चित्रपटगृहात चित्रपट पाहायला गेले नाहीत. घरातही ते आपल्या मुलाचे सिनेमे टीव्ही किंवा कॉम्प्युटरवर दाखवले तरच बघायचे.
पंकजने डॉक्टर व्हावे, वडिलांची इच्छा 2018 मध्ये एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत पंकज त्रिपाठी यांनी सांगितले होते की, त्यांच्या वडिलांची इच्छा नव्हती की, आपल्या मुलाने अभिनेता व्हावे. मुलाने शिक्षण घेऊन डॉक्टर व्हावे, अशी वडिलांची इच्छा होती. बिहारमधील ज्या भागात पंकज त्रिपाठी राहायचे, त्या भागात लोकांना फक्त दोनच व्यवसाय माहित आहेत - एक डॉक्टर आणि दुसरा इंजिनियर. आपला मुलगा आपला उदरनिर्वाह करू शकेल की नाही, याची चिंता त्याच्या वडिलांना असायची.