अभिनेता पंकज त्रिपाठीची '८३' सिनेमात वर्णी लागली आहे. पंकज त्रिपाठी यात मान सिंग यांची भूमिका साकारणार आहे. हा सिनेमा भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणारा आहे. कबीर खान दिग्दर्शित हा सिनेमा भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणारा आहे. १९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट टीमने विश्वचषक जिंकला होता. त्यावेळी भारतीय क्रिकेट संघाचे मॅनेजर मान सिंग होते. पंकज त्रिपाठी यांनी 'गँग ऑफ वासेपूर'मध्ये 'सुल्तान'मधील भूमिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
या सिनेमाच्या निमित्ताने रणवीर सिंगचे स्वप्न पूर्ण झाले आहे, रणवीर सिंगला पंकज त्रिपाठीसोबत काम करण्याची इच्छा गेल्या अनेक दिवसांपासून होती ती या निमित्ताने पूर्ण झाली. या सिनेमात रणवीर सिंग कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे. तर माजी क्रिकेट कर्णधार कृष्णमाचारी श्रीकांत यांची भूमिका दाक्षिणात्य अभिनेता जीवा वठविणार आहे. तर साहिल खट्टर माजी यष्टीरक्षक सैय्यद किरमानी याची भूमिका साकारणार आहे. पंजाबी अभिनेता एमी विर्कही या चित्रपटामध्ये झळकणार आहे. यात चिराग पाटील वडील संदीप पाटील यांची भूमिका साकारणार आहे.
सिनेमाच्या शूटिंग आधी कलाकारांसाठी मोहालीमध्ये एक बूट कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. एप्रिलमध्ये होणारे हे बूट कॅम्प जवळपास पंधरा दिवस चालणार आहे. यात कपिल देव, यशपाल शर्मा, मदन लाल आणि अन्य क्रिकेटर सहभागी होणार आहेत. या कॅम्पमध्ये क्रिकेटर्स सिनेमातील कलाकारांना क्रिकेट शिकवणार आहे.