Join us

इरफान खानच्या 'ह्या' चित्रपटात दिसणार पंकज त्रिपाठी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2019 17:40 IST

अभिनेता पंकज त्रिपाठीने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. आता तो अभिनेता इरफान खानसोबत दिसणार आहे.

गेल्या काही वर्षांपासून अभिनेता पंकज त्रिपाठीने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. विविध भूमिका साकारून पंकज त्रिपाठी चांगलाच प्रचलित झाला आहे. 'स्त्री', 'लुका छुपी', 'मिर्झापूर' वेबसीरिजमधील त्याच्या भूमिकेचे सगळीकडून खूप कौतूक झाले आहे. आता तो अभिनेता इरफान खानसोबत दिसणार आहे. 

इरफानला न्युरोएंडोक्राईन ट्युमर कॅन्सरचे निदान झाले होते. यावरच्या उपचारासाठी इरफान लंडनला रवाना झाला होता. पण आता इरफान भारतात परतला असून त्याने 'अंग्रेजी मीडियम' चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात केली आहे. या चित्रपटात इरफान खानसोबत पंकज त्रिपाठी कॅमियो करताना दिसणार आहे.

मिड डेच्या रिपोर्टनुसार पंकज त्रिपाठीने सांगितले की, ''अंग्रेजी मीडियम' चित्रपटात काम करण्याचा निर्णय मी घेतला कारण या चित्रपटात इरफान खान मुख्य भूमिकेत आहे आणि निर्माते दिनेश विजान यांच्याबद्दल माझ्या मनात खूप प्रेम व आपुलकी आहे. या चित्रपटात पंकज टोनी नामक फोर व्हिलर डिलरच्या भूमिकेत दिसणार आहे. जो इरफान खान व त्याच्या मुलीला युकेपर्यंत घेऊन जाण्यासाठी मदत करताना दिसणार आहे.'

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार निर्माते दिनेश विजान पंकज त्रिपाठीला आपल्या चित्रपटांसाठी लकी मानतो. त्यामुळे ते त्यांच्या चित्रपटात कोणत्या तरी कारणाने पंकज त्रिपाठी चित्रपटाचा हिस्सा बनेल, असा प्रयत्न करतात.

'अंग्रेजी मीडियम' चित्रपटाच्या पहिल्या शेड्युलच्या शूटिंगला उदयपूरमध्ये सुरूवात झाली आहे.

'अंग्रेजी मीडियम' चित्रपट हिंदी मीडियम चित्रपटाचा सीक्वल आहे. या चित्रपटात इरफान खानसोबत सबा कमर मुख्य भूमिकेत होती. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता.

टॅग्स :पंकज त्रिपाठीइरफान खान