पंकज उदास यांना गजलचा बादशहा म्हटले जाते. त्यांचा जन्म १७ मे १९५१ ला गुजरात मधील जेतपर येथे झाला. गजलला महत्त्व मिळवून देण्यात जगजीत सिंग, तलत अजीज यांच्यासोबत पंकज उदाज यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या अनेक गजल लोकांच्या हृदयाला स्पर्श करून जातात.
पंकज यांचे वडी शेती करत असत. तीन भावडांमध्ये हे सगळ्यात लहान आहेत. त्यांचे मोठे भाऊ मनहार उदास आणि निर्मल उदास हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक आहेत. या तीन भावांमध्ये निर्मल यांनी सगळ्यात पहिल्यांदा बॉलिवूडमध्ये आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली.
या दोन भावांमुळेच पंकज उदास यांनी देखील संगीतातच करियर करण्याचा विचार केला. मनहर यांचा एक गाण्याचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाचे प्रयोग ते देशभर करत असत. याच कार्यक्रमात पंकज ए मेरे वतन के हे गाणे गात असत. हे गाणे ऐकल्यानंतर एका प्रेक्षकांने त्यांना ५१ हजार रुपयांचे बक्षीस दिले होते.
राजकोटमधील संगीत नाट्य अकादमीमध्ये पंकज उदास यांनी चार वर्षं तबला वाजवण्याचे शिक्षण घेतले. त्यांनी शास्त्रीय संगीताचेदेखील धडे गिरवले आहेत. त्यांना १९७२ साली प्रदर्शित झालेल्या कामना या चित्रपटात सगळ्यात पहिल्यांदा गाणे गाण्याची संधी मिळाली.
या चित्रपटाच्या संगीतकार उषा खन्ना या होत्या. त्यांनीच पंकज यांचे नाव या चित्रपटासाठी सुचवले होते. हा चित्रपट फ्लॉप झाला असला तरी या चित्रपटातील त्यांच्या गाण्याचे कौतुक झाले. त्यानंतर त्यांनी गजल गाण्यास सुरुवात केली. यासाठी त्यांनी उर्दूचे शिक्षण घेतले. ते कॅनडा आणि अमेरिकेत गजलचे शो करू लागले. त्या दरम्यान ते जास्तीत काळ तिथेच राहात होते. त्यानंतर भारतात परकल्यानंतर त्यांनी आहट हा त्यांचा पहिला गजलचा अल्बम लाँच केला. यामुळे त्यांना प्रचंड प्रसिद्धी मिळाली.
१९८६ ला प्रदर्शित झालेल्या नाम या चित्रपटातील चिठ्ठी आयी या गाण्याने तर त्यांना एक वेगळी ओळख मिळवून दिली. या गाण्याचे संगीतकार आनंद बक्षी होते तर या गाण्याला संगीत आनंद बक्षी यांनी दिले होते. हे गाणे रसिकांना इतके आवडले होते की, हे गाणे ऐकताना अनेकांचे डोळे भरून येत असत. या चित्रपटाप्रमाणेच साजन, घायल, ये दिल्लगी या चित्रपटातील त्यांच्या गाण्यांना प्रसिद्धी मिळाली.