Join us  

कागज के फुल : आठवणीतले गुरूदत्त

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2016 8:30 AM

वसंत कुमार शिवशंकर पादुकोण उर्फ गुरूदत्त यांचा जन्म 9 जुलै 1925 साली कोलकात्यात झाला.गुरूदत्त यांचं संपूर्ण बालपण कोलकात्यात गेलं ...

वसंत कुमार शिवशंकर पादुकोण उर्फ गुरूदत्त यांचा जन्म 9 जुलै 1925 साली कोलकात्यात झाला.गुरूदत्त यांचं संपूर्ण बालपण कोलकात्यात गेलं असल्यामुळे त्यांनी त्यांच पादुकोण हे आडनाव ऐवजी गुरूदत्त लावायला सुरूवात केली. 'गुरूदत्त'  आडनाव बंगाली असल्यामुळे त्यांनी गुरूदत्त लावणं पसंत केलं. पुढे याच नावाने ते नावारूपाला आले.गुरूदत्त आभ्यासातही खूप हुशार होते,मात्र घरची हालाकीची परिस्थीती, त्यामुळे त्यांनी प्रसिध्द कोरिओग्राफर उदय शंकर यांचा ग्रुप जॅाईंट केला.तेव्हापासून गुरूदत्त यांची करिअरला खरी सुरूवातही ही कोरिओग्राफर म्हणूनच झाली. मात्र याधीही गुरूदत्त यांनी कोलकात्यात टेलीफोन ऑपरेटर म्हणूनही काम केलं. त्यानंतर 1944 साली ते मुंबईत आले.त्यांच्या स्ट्रगलच्या काळात त्यांना साथ दिली ती देवानंद यांनी. काही काळानंतर हे दोघंही चांगले मित्र बनले. त्यांनी एकमेकांना वचनही दिलं होतं की जर देवानंद निर्माता बनले तर ते गुरूदत्त यांना दिग्दर्शन करायाला संधी देतील आणि गुरूदत्त दिग्दर्शक बनले तर देवानंद यांना ते  संधी देतील तसं पुढे झालंही. देवानंद यांनी 'बाजी' सिनेमा प्रोड्यूस केला आणि गुरूदत्त  यांना सिनेमात दिग्दर्शनाची जबाबदारी सोपवली. मात्र जेव्हा गुरूदत्त निर्माते बनले तेव्हा त्यांनी देवानंदला आपल्या सिनेमात  संधी तर दिली. मात्र दिग्दर्शनाची जबाबदारी देवानंद यांना न देता राज खोसला यांच्यावर सोपवली. तो सिनेमा होता  'सीआयडी'. बघता-बघता  गुरूदत्त यशोशिखरावर पोहचत होते.1965 पर्यंत ते या इंडस्ट्रीत सेटलही झालेले होते. या काळात त्यांनी यशस्वी सिनेमे दिले. आरपार,मिस्टर एंड मिसेस 55, सीआडी, प्यासा असे एक से बढकर हिट सिनेमे गुरूदत्त यांनी दिले.ज्या सिनेमांमुळे ते चांगले दिग्दर्शक म्हणून नावारूपाला आले त्याचं सिनेमामुळे ते खूप खचलेही गेले.  त्यांच्या यशस्वी कारकिर्दीत असं काही घडलं की त्यांनी दिग्दर्शनातून संन्यास घेतला, यासाठी कारणीभूत ठरला 'कागज के फुल' हा सिनेमा, त्यांनी हा सिनेमा बनवला आणि तो असा काही आपटला की होत्याचं नव्हतं झालं. मात्र ते सिनेमात अभिनय करत राहिले. त्यानंतर  'चौधवीं का चाँद' हा सिनेमा आलाा,सिनेमात त्याचे डायलाॅग डिलेव्हरीमुळे त्यांनी खूप वाहवा मिळवलीय ही मात्र सिनेमातला त्यांचा एक डायलाॅग खूप भावला तो  असा होता, की आयुष्यात दोनच गोष्टी होतात एक तर तुम्ही यशस्वी होतात किंवा मग अयशस्वी. डायलाॅगप्रमाणे त्यांच्या करिअरमध्ये तसे चढउतार आलेही.करिअर मध्ये आलेल्या चढउतारामुळे ते कधीच खचले नाहीत, मिळालेले काम प्रामाणिकपणे करत गेले, विशेष म्हणजे त्यांच्या दिग्दर्शनावेळी त्यांनी अनेक नवीन चेह-यांनाही संधी दिली. त्यात वहिदा रेहमान,जॅानी वॅाकर यांचा आवर्जुन उल्लेख करावा लागेल. पुढे त्यांनी प्रसिध्द गीता दत्त यांच्याशी प्रेम विवाह केला. तरूण,अरूण आणि नीना ही त्यांना तीन मुलं झाली.मात्र काही दिवसांनतर गीता दत्त आणि गुरूदत्त यांच्या नात्याला ग्रहण लागलं, गुरूदत्त याचं वहिदा रेहमान यांच्याशी अफेरअच्या चर्चा रंगू लागल्या, त्यामुळे गीता दत्त यांनी गुरू दत्त यांच्याशी वेगळं होण्याचा निर्णयघेतला. या सगळ्या गोष्टींमुळे गुरूदत्त दारूच्या नशेत धुंद राहायला लागले. अखेर झोपेच्या गोळ्या खावून त्यांनी स्वत:चं जीवन संपवलं. ज्यावेळी गुरूदत्त आयुष्याचे काही क्षण मोजत होते त्यावेळी त्यांच्या पत्नी गीता दत्तची ते आतुरतेने वाट पाहात होते,त्यांना वाटायचं की एकदा तरी गीता त्यांच्या मुलांना घेवून त्यांना भेटायला येईल मात्र तसं काही झालं नाही. पत्नीला भेटण्यासाठी गूरूदत्त खूप आतुर झाले होते, त्यामुळेच त्यांनी आशा भोसले यांना फोन केला आणि गीता बद्दल विचारणा केली. जगाचा निरोप घेण्याआधी गुरूदत्त यांचं शेवटचं बोलणं झालं होतं ते फक्त आशा भोसले यांच्या बरोबरच. गुरूदत्त जगाचा निरोप घेण्याआधी आशा भोसले यांच्याशी शेवटचं फोनवर त्यांच बोलणं झालं.मात्र शेवटपर्यंत त्यांच्या पत्नीला भेटण्याची गुरूदत्त यांची ईच्छा अपूर्णच राहिली.