यासाठी चित्रपट निर्मात्यांना बोर्डाच्या वेबसाइटवर दिलेला अर्ज इत्यंभूत माहितीनिशी भरावा लागणार आहे. त्यामुळे निर्मात्यांना आता बोर्डाच्या कार्यालयाची पायपीट करण्याची गरज नाही. केवळ स्क्रिनिंग सर्टिफिकेटसाटीच निर्मात्यांना बोर्डाच्या कार्यालयात जावे लागेल. बोर्डाने प्रोमो, ट्रेलर्स आणि लघुपटाच्या सबमिशनची लिमिट केवळ १० मिनिटांचीच ठेवली आहे. त्याचबरोबर निर्मात्यांना त्यांच्या चित्रपटाचे पहिली कॉपी डिव्हीडी स्वरूपात देण्याची आवश्यकता नसेल. तसेच फिजिकली कुठल्याही प्रकारचे कामकाज करण्याची गरज नसेल. सर्व काही पेपरलेस आणि आॅनलाइन होणार असल्याने कामात सुसूत्रता येईल, अशी अपेक्षा बॉलिवूडकरांकडून व्यक्त केली जात आहे. याबाबतची संपूर्ण माहिती केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी ट्विटरवर दिली.}}}} ">In e-cinepramaan, status of each application would be visible online in the dashboard of the producer / concerned #CBFC official. pic.twitter.com/st5eSqvtgJ— M Venkaiah Naidu (@MVenkaiahNaidu) March 27, 2017
सेन्सॉर बोर्डाचा कारभार झाला पेपरलेस; आॅनलाइन पद्धतीनेच मिळेल सर्टिफिकेट!!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2017 8:28 AM
चित्रपटांमधील आक्षेपार्ह भागांवर कातर चालविणारे पर्यायाने बॅन आणणाºया सेन्सॉर बोर्डाने पेपरलेस कारभाराकडे मोर्चा वळविला असून, आता सर्व प्रोसेस आॅनलाइन ...
चित्रपटांमधील आक्षेपार्ह भागांवर कातर चालविणारे पर्यायाने बॅन आणणाºया सेन्सॉर बोर्डाने पेपरलेस कारभाराकडे मोर्चा वळविला असून, आता सर्व प्रोसेस आॅनलाइन पद्धतीने फॉलो केली जाणार आहे. केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू आणि बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी गेल्या सोमवारी हा नवा नियम लागू केल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे कुठल्याही चित्रपटाला सर्टिफिकेट मिळवण्यासाठी आॅनलाइन पद्धतीने बोर्डाकडे प्रोसेस करावी लागणार आहे. प्रकाश झा निर्मित ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ या चित्रपटावर सेन्सॉर बोर्डाने बॅन आणल्यानंतर बॉलिवूडमधून प्रचंड रोष व्यक्त करण्यात आला. झा यांनी तर यापुढे धार्मिक चित्रपटांची निर्मिती करणार असल्याचे सांगितले होते. सेन्सॉर बोर्ड हा द्वेषाने कारभार करीत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला होता. सेन्सॉरच्या कारभाराबद्दल पहिल्यांदाच अशाप्रकारचा रोष व्यक्त केला गेला असे अजिबात नाही, तर यापूर्वीदेखील सेन्सॉरवर टीका केली गेली. हा सर्व विचार करूनच सेन्सॉरने पेपरलेस आणि ट्रान्सपरंट कारभारासाठी आॅनलाइनची कास धरली आहे.