बॉलिवूड सिंगर पपॉनने एक चूक केली आणि त्याला त्या चुकीची पुरेपूर किंमत चुकवावी लागली. ‘द वॉईस इंडिया किड्स’ या सिंगींग रिअॅलिटी शोच्या एका अल्पवयीन स्पर्धक मुलीला चुकीच्या पद्धतीने किस करून पपॉनने वाद ओढवून घेतला होता. हा वाद पपॉनच्या चांगलाच अंगलट आला होता. या वादानंतर पपॉनला शोच्या परिक्षक पदावरून हटवले गेले आणि पुढे पपॉपच्या करिअरच्या गाडीलाही ब्रेक लागला. लोक त्याला टाळू लागलेत, आॅफर्स मिळेनाशा झाल्यात. आसामच्या ज्या बिहू फेस्टिवलमध्ये पपॉन सगळ्यांचे आकर्षण असायचा. त्याला ऐकण्यासाठी या फेस्टिवलमध्ये लाखो लोक यायचे. त्या फेस्टिवलच्या आयोजकांनीही पपॉनकडे पाठ फिरवली. गत सहा महिने पपॉनची कसोटी पाहणारे ठरलेत. पण आता या वादानंतर तब्बल सहा महिन्यांनी पपॉन आपल्या नव्या गाण्याने वापसी करतोय.
होय, III Smoking Barrelsच्या मेकर्सनी आपल्या चित्रपटाचे पहिले गाणे रिलीज केले आहे. हे गाणे पपॉनने गायले व कम्पोज केले आहे़ ‘ये तिश्नगी’ असे या गाण्याचे शब्द आहेत. रॉक आणि कटेम्पररी बॉलिवूड स्टाईलचे हे गाणे हिंदी आणि आसामी भाषेत रिलीज करण्यात आले आहे.साहजिकचं या गाण्याबद्दल पपॉन कमालीचा उत्सूक आहे. एकच गाणे हिंदी व आसामी भाषेत गाण्याचा अनुभव सुंदर होता़ लोकांना हे गाणे आवडेल, अशी आशा आहे, असे पपॉन म्हणाला.
काय आहे प्रकरणगत फेबु्रवारीत ‘द वॉईस इंडिया किड्स’चा होळी स्पेशल एपिसोड शूट केल्यानंतर पपॉन शोच्या मुलांसोबत आपल्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये बसून मौज मस्ती करताना दिसला होता. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओच्या अखेरिस पपॉन एका मुलीला चुकीच्या पद्धतीने किस करताना दिसला होता. यानंतर लगेच पपॉन फेसबुक लाईव्ह बंद करण्याचे आदेश देतानाही यात दिसला होता. हा व्हिडिओ व्हायरल होताच,सोशल मीडियावर पपॉनच्या या कृत्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला गेला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या एका वकीलाने यासंदर्भात राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाला पत्र लिहिले होते. सिंगर पपॉनने हाताने होळीचे रंग लावत एका मुलीला चुकीच्या पद्धतीने किस केले, हे पाहून मला धक्का बसला आहे. मी व्हिडिओ पाहिला आहे. संपूण देशातील प्रतिभावान मुलांना हा रिअॅलिटी शो खुणावत आहे. अशात मी मुलांच्या सुरक्षा आणि संरक्षणाबद्दल चिंतीत आहे, असे भूयन यांनी आपल्या पत्रात लिहिले होते.