Join us

​‘किस’ करून फसला होता पपॉन! आता मिळेनाशा झाल्यात शोच्या आॅफर!!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2018 8:12 AM

अनेकदा एखादी चूक(?)ही आयुष्यातून उठवणारी ठरते. बॉलिवूड गायक पपॉन याला सध्या याचीच अनुभूती येत असावी. ‘द वॉईस इंडिया किड्स’ ...

अनेकदा एखादी चूक(?)ही आयुष्यातून उठवणारी ठरते. बॉलिवूड गायक पपॉन याला सध्या याचीच अनुभूती येत असावी. ‘द वॉईस इंडिया किड्स’ या सिंगींग रिअ‍ॅलिटी शोच्या एका अल्पवयीन स्पर्धक मुलीला चुकीच्या पद्धतीने किस करून पपॉनने वाद ओढवून घेतला होता. हा वाद पपॉनच्या सध्या चांगलाच अंगलट येतोय. या वादानंतर पपॉनला शोच्या परिक्षक पदावरून हटवले होते आणि आता तर पपॉपला आॅफर्स मिळेनाशा झाल्या आहेत. होय, याआधी आसामच्या बिहू फेस्टिवलमध्ये पपॉन सगळ्यांचे आकर्षण असायचा. त्याला ऐकण्यासाठी बिहू फेस्टिवलमध्ये लाखो लोक यायचे. मूळचा आसामचाच असल्याने पपॉन या फेस्टिवलची शान होता, असे म्हणायलाही हरकत नाही. पण यंदा मात्र या फेस्टिवलच्या आयोजकांनी पपॉनला विचारलेदेखील नाही. कारण अर्थातचं पपॉनने ओढवून घेतलेला वाद.स्पॉटबॉयने दिलेल्या वृत्तानुसार, किसींग कॉन्ट्रोवर्सीमध्ये अडकलेल्या पपॉनला बोलवून आयोजकांना कुठलाही नसत्या वादात अडकायचे नव्हते. पपॉनला बघून लोक कसे रिअ‍ॅक्ट होतील, याबद्दल आयोजक साशंक होते. म्हणून यंदा जाणीवपूर्वक पपॉनला या फेस्टिवलमधून वगळले गेले. या वगळण्याचे दु:ख पपॉनशिवाय आणखी कोण बरे समजू शकेल?काय आहे प्रकरणगत फेबु्रवारीत ‘द वॉईस इंडिया किड्स’चा होळी स्पेशल एपिसोड शूट केल्यानंतर पपॉन शोच्या मुलांसोबत आपल्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये बसून मौज मस्ती करताना दिसला होता. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या  व्हिडिओच्या अखेरिस पपॉन एका मुलीला चुकीच्या पद्धतीने किस करताना दिसला होता.  यानंतर लगेच पपॉन फेसबुक लाईव्ह बंद करण्याचे आदेश देतानाही यात दिसला होता. हा व्हिडिओ व्हायरल होताच,सोशल मीडियावर पपॉनच्या या कृत्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला गेला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या एका वकीलाने यासंदर्भात राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाला पत्र लिहिले  होते.   सिंगर पपॉनने हाताने होळीचे रंग लावत एका मुलीला चुकीच्या पद्धतीने किस केले, हे पाहून मला धक्का बसला आहे. मी व्हिडिओ पाहिला आहे. संपूण देशातील प्रतिभावान मुलांना हा रिअ‍ॅलिटी शो खुणावत आहे. अशात मी मुलांच्या सुरक्षा आणि संरक्षणाबद्दल चिंतीत आहे, असे भूयन यांनी आपल्या पत्रात लिहिले होते.