जर आपण महिला कॉमेडियनबद्दल बोललो तर पहिले नाव डोळ्यासमोर येते ते म्हणजे भारती सिंग. पण चित्रपट रसिकांना हे चांगलेच ठाऊक आहे की, कॉमेडी पडद्यावर आणणारी स्त्री विनोदी कलाकार दुसरीच कोणीतरी आहे. ही कॉमेडियन म्हणजे टुनटुन (Tuntun). होय, प्रत्येकजण त्यांना या नावाने ओळखतो, जरी त्यांचे खरे नाव उमा देवी होते, ज्या नेहमी त्यांच्या जाड शरीरासाठी आणि जबरदस्त कॉमिक टाइमिंगसाठी लक्षात ठेवली जाते. त्यांच्या आवाजात जितका गोडवा होता तितकाच नैसर्गिकपणा त्यांच्या विनोदातही होता. त्यांच्या आयुष्यात हसू आणि आनंदाचा गोडवा फार कमी आला ही वेगळी गोष्ट आहे.
टुनटुन यांच्या आई-वडिलांची ती लहान असतानाच हत्या करण्यात आली होती. त्यांचा भाऊही मरण पावला तेव्हा त्या नऊ वर्षांची असतील. टुनटून यांना नातेवाईकांच्या घरी दिवस काढावे लागले. त्यांना गाण्याची इच्छा होती, म्हणून एके दिवशी त्या घरातून पळून मुंबईत आल्या. तिथे दिग्दर्शक नितीन बोस यांचे असिस्टंट जव्वाद हुसैन यांनी त्यांना त्यांच्या घरात आश्रय दिला.
असा मिळाला पहिला ब्रेक
एके दिवशी फिल्मी पद्धतींबद्दल अनभिज्ञ असलेल्या टुनटून यांनी कारदारच्या घरात प्रवेश केला आणि कारदार कुठे भेटणार असे विचारले आणि त्यांना गाणे गायचे आहे, असे सांगितले. त्यांचा आत्मविश्वास पाहून कारदार यांनी त्यांचे गाणे ऐकले आणि त्यांना संधीही दिली, त्यानंतर टुनटून यांना ५०० रुपये देण्यात आले. महिन्याच्या पगारात गाण्याची संधी मिळाली. अफसाना लिखा राही हूं हे अविस्मरणीय गाणे त्यांच्या आवाजात रेकॉर्ड झाले.
पार्श्वगायिका म्हणून टुनटून यांनी जवळपास ४५ गाणी गायली आहेत. यानंतर लग्न आणि कौटुंबिक जीवनामुळे त्यांना चित्रपटांपासून दूर राहावे लागले. नंतर त्यांनी पुन्हा चित्रपटांमध्ये पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला पण नंतर नौशादने त्यांना कॉमेडियनची भूमिका ऑफर केली. इथून तिला टुनटुन हे नाव पडले आणि बॉलिवूडची पहिली महिला कॉमेडीयन म्हणून त्या ओळखल्या जाऊ लागल्या. मात्र, चित्रपटांना अलविदा केल्यानंतर त्यांचे दिवस फारसे चांगले गेले नाहीत. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांना त्यांचे शेवटचे दिवस चाळीत व्यतित करावे लागले. तसेच त्यांच्याकडे उदरनिर्वाह करण्यासाठी पैसेदेखील नव्हते. कसेबसे औषधांसाठी पैसे जमा करत होती. टुनटुन यांनी २००३ साली जगाचा निरोप घेतला.