गेल्या काही दिवसांपासून 'हेरी फेरी' आणि 'ओह माय गॉड' या सुपरहिट ठरलेल्या सिनेमांचा सिक्वेलची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. अखेर मुहुर्त ठरला आणि पुढच्या वर्षी हे सिनेमे रसिकांच्या भेटीला येणार असल्याचे खुद्द परेश रावल यांनी सांगितले आहे. या सिनेमांनी रसिकांची पसंती मिळवण्याबरोबर बॉक्स ऑफिसरवरही चांगला गल्ला जमवला होता. या सिनेमात परेश रावल आणि अक्षय कुमार यांनी आपल्या अभिनयाने रसिकांना अक्षरक्ष: लोटपोट केले होते.
2000 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हेरा फेरी'मध्ये परेश यांच्या व्यतिरिक्त सुनील शेट्टी, अक्षय कुमार मुख्य भूमिकेत होते. त्यानंतर 2006 मध्ये 'फिर हेरा फेरी' सिनेमाचा दुसरा भाग प्रदर्शित झाला होता. सिनेमांना मिळालेल्या यशामुळे पुन्हा एकदा हे सिनेमे रसिकांच्या भेटीला आणण्याचा घाट निर्मात्यांनी घातला आहे.
त्यानुसार 'हेरी फेरी' आणि 'ओह माय गॉड' या हिट विनोदी सिनेमांता सिक्वेल पुढील वर्षी प्रदर्शित होणार म्हटल्यावर रसिकांसाठी एक मोठी मनोरंजनाची पर्वणीच ठरणार हे मात्र नक्की. अद्याप सिनेमांची घोषणा करण्यात आली असली तरी सिनेमात स्टारकास्टविषयीची माहिती गुलदस्त्यातच ठेवण्यात आली आहे. त्यामुळे या सिनेमाविषयी अधिक माहीत जाणून घेण्यासाठी आणखीन काही दिवस रसिकांना वाट पहावी लागणार असेच दिसतंय.