या प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत झाले आहे परेश रावल यांचे लग्न, दोन मुलांचे बाप आहेत परेश
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2018 7:08 AM
कॉमेडी, गंभीर, भावनिक अशा सर्वच प्रकारच्या दमदार भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांनी आतापर्यंत सुमारे दोनशेपेक्षा अधिक चित्रपटांमध्ये ...
कॉमेडी, गंभीर, भावनिक अशा सर्वच प्रकारच्या दमदार भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांनी आतापर्यंत सुमारे दोनशेपेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. परेश रावल यांचा जन्म ३० मे १९५५ ला गुजरातमध्ये झाला. त्यांनी १९८५ साली अर्जुन या चित्रपटाद्वारे त्यांनी कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटानंतर पुढच्याच वर्षी त्यांचा नाम हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने त्यांना एक ओळख मिळवून दिली. आजवर त्यांनी अनेक प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्यांमध्ये त्यांची गणना केली जाते. परेश रावल हे अनेक वर्षं अभिनयक्षेत्राचा भाग असले तरी ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी मीडियात न बोलणेच पसंत करतात. खूपच कमी जणांना माहीत आहे की, परेश रावल यांची पत्नी एक प्रसिद्ध अभिनेत्री असून तिने अनेक चित्रपटांमध्ये, मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच त्यांना दोन मुले असून त्यांची नावे अनिरुद्ध आणि आदित्य आहेत.स्वरूप संपत यांनी १९७९ च्या मिस इंडियाच्या किताबावर नाव कोरले आहे. तसेच त्यांनी बऱ्याचशा चित्रपटांत आणि टीव्ही शोमध्येदेखील काम केले आहे. तुम्हाला २०१६ मध्ये आलेल्या अर्जुन कपूूर आणि करिना कपूर स्टारर ‘की अॅण्ड का’ हा चित्रपट आठवतो काय? या चित्रपटात करिनाच्या आईची भूमिका स्वरूप संपत यांनी साकारली होती. ये जो है जिंदगी या कॉमेडी शोमुळे त्या खूपच चर्चेत आल्या होत्या. या प्रसिद्ध कार्यक्रमात त्या आपल्याला शफी इनामदार यांच्यासोबत पाहायला मिळाल्या होत्या. तसेच त्यांचा ऑल द बेस्ट हा कार्यक्रम देखील चांगलाच गाजला होता. स्वरूप यांनी १९८१ मध्ये ‘नरम गरम’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एंट्री केली होती. त्यांचा हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर बऱ्यापैकी चालला. परंतु १९८४ मध्ये आलेल्या कमल हासन-रिना रॉय स्टारर ‘करिश्मा’ या चित्रपटाने त्यांना खऱ्या अर्थाने ओळख मिळवून दिली. अर्थात ही ओळख वादग्रस्त ठरली होती. चित्रपटात स्वरूप बिकिनीमध्ये बघावयास मिळाल्या होत्या. त्यांची परफेक्ट फिगर बघून चाहते दंग झाले होते. Also Read : परेश रावलने म्हटले, सुनील दत्तची भूमिका साकारणे सुखद अनुभव!