विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचे निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर झाले आहेत. राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडीमध्ये झालेल्या लढाईत जनतेने महायुतीला विजयाचा कौल दिला आहे. मविआमधील अनेक बड्या नेत्यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे. राज्यात भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीला २८८ पैकी २०० पार मजल सहज मारली. भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे) तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांनी प्रचंड विजय मिळवला. आता निकाल जाहिर झाल्यावर बऱ्याच कलाकारांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत.
महायुतीच्या विजयावर उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत निकालाची आकडेवारी समोर आल्यानंतर संजय राऊत यांनी ट्विट करत "महाराष्ट्राचा निकाल हा जनतेचा कौल नाही. बॅलट पेपर (मतपत्रिका) वर पुन्हा निवडणूक घ्या! जगाच्या पाठीवर निवडणुकीत इतका फ्रॉड झाला नसेल". यावर बॉलिवूड अभिनेते आणि भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार परेश रावल यांनी पोस्ट शेअर केली. परेश रावल यांनी ट्विट करत "संजय उवाच । संजय उगाच च ॥", असं म्हणत मोजक्यात शब्दात संजय राऊत यांना टोला लगावला आहे.
याशिवाय परेश रावल यांनी महाविकास आघाडीवर टीका करणाऱ्या काही उपहासात्मक पोस्ट शेअर केल्या आहेत. परेश रावल हे पंतप्रधान मोदींचे ते विश्वासू सहकारी मानले जातात. त्यांच्या अभिनय कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं तरपरेश रावल यांनी २४० पेक्षा जास्त सिनेमांमध्ये काम केलं आहे. त्यामुळे इतक्या वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी अमाप संपत्ती, यश मिळवलं आहे.