हेराफेरी, ओह माय गॉड यासारखे यादगार सिनेमे देणारे ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांचा काल वाढदिवस होता. अभिनय ते राजकारण असा प्रवास करणारे परेश यांना चांगलेच फॅन फॉलोव्हिंग आहे. २०० पेक्षा अधिक चित्रपट आणि विनोदी ते खलनायक अशा वेगवेगळ्या भूमिका साकारणारे परेश यांना खरी ओळख मिळाली ती विनोदी भूमिकांमुळे.
परेश रावल यांनी मिस इंडिया स्वरूप संपत यांच्यासोबत लग्न केले. १९७९ मध्ये स्वरूप संपत यांनी मिस इंडिया किताब जिंकला होता.
स्वरूप या सुद्धा अभिनयक्षेत्राशी संबंधित आहेत. ‘ये जो जिंदगी है’ या विनोदी मालिकेत स्वरूप यांनी काम केले होते. १९८४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘करिश्मा’ या चित्रपटात त्या कमल हासन आणि रिना रॉय यांच्यासोबत दिसल्या होत्या. त्या काळात बिकनी सीन्स देऊन त्यांनी खळबळ माजवली होती. त्यांनी नरम गरम, हिम्मतवाला, साथिया, सप्तपदी, की अॅण्ड का अशा अनेक चित्रपटांत महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
स्वरूप यांनी श्रृंगार या कंपनीसाठी मॉडेलिंगही केले होते. स्वरूप आता चित्रपटांमध्ये खूपच कमी काम करतात. त्या दिव्यांग मुलांना अभिनय शिकवतात. एका मुलाखतीत स्वरूप यांनी मिस इंडिया स्पर्धेबद्दल सांगितले होते. त्यांनी सांगितले होते की, मी मिस इंडियाचा किताब जिंकला तेव्हा अनेकांना विश्वास बसत नव्हत. कारण मी अनेक वर्षे एका छोट्याशा गावात एका झोपडीत राहत होते.
स्वरूप चित्रपटांत काम करताना कधीही आरसा बघत नसत. कॉस्च्युम, लूक याबद्दल त्या कधीही चर्चा करत नसत. हिम्मतवाला या चित्रटानंतर स्वरूप यांनी इंडस्ट्रीतून काहीसे अलिप्त होत समाजसेवेत स्वत:ला झोकून दिले. त्यांनी अनेक पुस्तकेही लिहिली आहेत.