Join us

जेव्हा सेटवर बिकिनी घालून आली होती परेश रावलची पत्नी...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2017 1:56 PM

कॉमेडी, गंभीर, भावनिक अशा सर्वच प्रकारच्या दमदार भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांनी आतापर्यंत सुमारे दोनशेपेक्षा अधिक चित्रपटांमध्ये ...

कॉमेडी, गंभीर, भावनिक अशा सर्वच प्रकारच्या दमदार भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांनी आतापर्यंत सुमारे दोनशेपेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र अशातही मोजकेच लोक आहेत, ज्यांना त्यांच्या परिवाराविषयी माहिती आहे. आज आम्ही तुम्हाला परेश रावल यांच्या पत्नीविषयी सांगणार आहोत. परेश रावल यांच्या पत्नीचे नाव स्वरूप संपत आहे. स्वरूप यांनी १९७९ च्या मिस इंडियाच्या किताबावर नाव कोरले आहे. तसेच त्यांनी बºयाचशा चित्रपटांत आणि टीव्ही शोमध्येदेखील काम केले आहे. तुम्हाला २०१६ मध्ये आलेल्या अर्जुन कपूूर आणि करिना कपूर स्टारर ‘की अ‍ॅण्ड का’ हा चित्रपट आठवतो काय? या चित्रपटात करिणाच्या आईची भूमिका स्वरूप संपत यांनी केली आहे. मात्र स्वरूप एक चित्रपट असाही होता, ज्यामुळे त्या वादाच्या भोवºयात अडकल्या होत्या. वास्तविक, स्वरूप संपत यांनी एका चित्रपटात बिकिनी सीन्स देऊन सगळ्यांनाच धक्का दिला होता. स्वरूप यांनी १९८१ मध्ये ‘नरम गरम’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एंट्री केली होती. त्यांचा हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर बºयापैकी प्रेक्षकांनी पसंतही केला होता. परंतु १९८४ मध्ये आलेल्या कमल हासन-रिना रॉय स्टारर ‘करिश्मा’ या चित्रपटाने त्यांना खºया अर्थाने ओळख निर्माण करून दिली. अर्थात ही ओळख वादग्रस्त ठरली होती. चित्रपटात स्वरूप बिकिनीमध्ये बघावयास मिळाल्या होत्या. त्यांचा परफेक्ट फिगर बघून चाहते दंग राहिले होते. स्वरूपच्या या बिकिनी सीन्समुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. वास्तविक जेव्हा त्या सेटवर बिकिनी घालून आल्या होत्या, तेव्हाच सगळ्यांना धक्का बसला होता. स्वरूप यांनी १९७९ मध्ये मिस इंडिया स्पर्धा जिंकल्यानंतर त्याचवर्षी मिस युनिव्हर्स या स्पर्धेत भारताला रिप्रेजेंट केले होते. स्वरूप यांनी ‘ये दुनिया गजब की’, ‘आॅल द बेस्ट’ आणि ‘टेक इट ईजी’ यांसारख्या मालिकांमध्येही काम केले आहे. त्याव्यतिरिक्त ‘ये जो है जिंदगी’ या कॉमेडी शोमुळे त्या खूपच चर्चेत आल्या होत्या. यामध्ये त्यांनी दिवंगत अभिनेते शफी इनामदार यांच्या पत्नीची भूमिका साकारली होती. असे म्हटले जात आहे की, या शोसाठी त्यांनी अनेक मोठ्या शोच्या आॅफर्स नाकारल्या होत्या. सध्या स्वरूप संपत दिव्यांग मुलांना अभिनयाचे धडे देतात. या व्यतिरिक्त त्यांनी कुंकू बनविणाºया शृंगार या कंपनीसाठीही मॉडलिंग केले आहे. जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरात राज्याचे मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांनी मुलांच्या एज्युकेशन प्रोग्रामसाठी स्वरूप यांची प्रमुख पदावर निवड केली होती. स्वरूप यांनी बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.