Join us

लग्नाआधी परिणीती चोप्रा-राघव चड्ढा महादेवाच्या दर्शनाला, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2023 17:24 IST

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. परिणीती आप खासदार राघव चड्ढा यांच्याबरोबर लग्नाच्या बेडीत अडकून नवीन इनिंगला सुरुवात करणार आहे. सप्टेंबर महिन्यात परिणीती आणि राघव यांचा विवाहसोहळा पार पडणार असल्याचं वृत्त आहे. चोप्रा आणि चड्ढा कुटुंबीयांना त्यांच्या शाही विवाहसोहळ्याची तयारीही सुरू केली आहे. एकीकडे लग्नाची जोरदार तयारी सुरू असताना दुसरीकडे परिणीती आणि राघव देवदर्शन करत आहेत.

लग्नाच्या महिनाभरापूर्वीच परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी उजैन येथील महाकालेश्वर मंदिराला भेट देत महादेवाचं दर्शन घेतलं. यावेळी परिणीतीने गुलाबी रंगाची साडी नेसली होती. तर राघव चड्ढा यांनी पारंपरिक लूक केला होता. महादेवाच्या मंदिरात परिणीती आणि राघव चड्ढा नतमस्तक झाले. त्यांनी मंदिरात आरतीही केली. त्यांचे महाकालेश्वर मंदिरातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. याआधीही राघव व परिणीती अमृतसरमधील सुवर्णमंदिरात एकत्र दिसून आले होते.

परिणीती आणि राघव यांचा १३ मे रोजी साखरपुडा पार पडला. आता २५ सप्टेंबरला ते विवाहबंधनात अडकणार आहेत. गुरुग्राम येथे त्यांच्या लग्नाचा रिसेप्शन सोहळा असणार आहे. परिणीती चोप्रा व राघव चड्ढा यांनी ‘लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स’ येथून शिक्षण घेतलं आहे. तिथेच त्यांची मैत्री झाली. काही महिन्यांपूर्वी राघव चड्ढा परिणीतीला तिच्या शूटिंगदरम्यान पंजाबमध्ये भेटले होते. तेव्हापासून त्यांची लव्हस्टोरी सुरू झाली. अनेकदा त्यांना एकत्र स्पॉटही करण्यात आलं होतं.

टॅग्स :परिणीती चोप्राबॉलिवूडसेलिब्रिटी