साखरपुड्यानंतर परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि राघव चड्ढा (Raghav Chadha) सतत चर्चेत आहेत. सध्या दोघेही राजस्थान दौऱ्यामुळे लाईमलाईटमध्ये आले आहेत. यासोबतच परिणीती आणि राघव राजस्थानमध्ये लग्नासाठी लोकेशन शोधत असल्याची चर्चा चित्रपट वर्तुळात सुरु आहे. याविषयी जाणून घेऊया.
परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा त्यांच्या लग्नासाठी बेस्ट लॉकेशनच्या शोधात पहिल्यांदा उदयपूरला गेले. उदयपूर हे लग्नासाठी खूप खास ठिकाण मानले जाते. याच कारणामुळे हे कपल लग्नाचं ठिकाण शोधण्यासाठी उदयपूरला पोहोचले.
उदयपूरनंतर परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी किशनगढचा ही आढावा घेतला. ग्लॅमरच्या दुनियेत अशी चर्चा आहे की इथंही हे कपल त्यांच्या लग्नाचे लोकेशन शोधण्यासाठी गेले होते. आता या दोघांनी लग्नासाठी कोणत्या जागेची निवड केली आहे हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांची दिल्लीत काही दिवसांपूर्वी एंगेजमेंट झाली आहे. प्रियंका चोप्रासोबत अनेक स्टार्सनी त्यांच्या एंगेजमेंटला हजेरी लावली होती. परिणीती चोप्राचे चाहते तिच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
परिणीती राघव यांच्या लव्हस्टोरीबद्दल सांगायचं तर, परिणीती आणि राघव यांचं एकाच कॉलेजमध्ये शिक्षण झाले असले तरी, दोघांच्या प्रेमाची सुरुवात मात्र नुकताच झाली आहे. दोघे पंजाब येथे भेटले आणि दोघांमधील प्रेम बहरले. परिणीती तेव्हा पंजाब येथे सिनेमाचे शुटिंग करत होती. तेव्हाच दोघांची भेट झाली आणि भेटीचं रुपांतर प्रेमात झाले असे सांगण्यात येत आहे.