Parineeti Chopra and Raghav Chadha at the Mumbai airport : अभिनेत्री परिणीती चोप्राच्या अफेअरच्या (Parineeti Chopra ) चर्चा इतक्यात तरी थांबायचं चिन्ह नाही. आता तर या चर्चांना आणखीच जोर चढला आहे. परिणीती आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्ढा यांना डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे. इतकंच नाही तर लवकरच दोघांना रोका होणार असल्याचा दावाही अनेक रिपोर्टमध्ये केला गेला आहे. परिणीती व राघव दोघंही यावर काहीही बोलायला तयार नाहीत. पण दोघांचे एकत्र व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. काही दिवसांपूर्वी परिणीती राघव चड्ढा यांच्यासह स्पॉट झाली होती. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावरही प्रचंड व्हायरल झाला होता. आता दोघांचा मुंबई एअरपोर्टवरचा आणखी एक व्हिडीओ चर्चेत आला आहे.अलीकडे परिणीतीला राघव चड्ढा यांच्यासह एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आलं. सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने दोघांचा व्हिडीओ शेअर केला आहे. साहजिकच हा व्हिडीओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट्स वर्षाव केलाय.
याआधी एका रेस्टॉरंटबाहेर दोघांनाही स्पॉट केलं गेलं. मस्ती मूडमधील त्यांचे रेस्टॉरंटबाहेरचे फोटो व्हायरल होताच, परिणीती व राघव यांच्या डेटींगच्या चर्चा सुरू झाल्यात होत्या. अद्याप परिणीती व राघव यावर काहीही बोललेले नाहीत. मात्र परिणीता व राघव चड्ढा यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आम आदमी पक्षाचे खासदार संजीव अरोरा यांनी ट्वीट करत दोघांच्या नात्यावर शिक्कामोर्तब केलं होतं. त्यानंतर पंजाबी गायक हार्डी सिंधूनेही परिणीती व राघव चड्ढाला शुभेच्छा दिल्या होत्या. राघव चड्ढा हे आम आदमी पार्टीचे प्रसिद्ध नेते आहेत आणि पंजाबचे राज्यसभा खासदार आहेत.
यावर्षाच्या जानेवारी महिन्यात परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांना 'इंडिया यूके आउटस्टँडिंग अचिव्हर ऑनर्स' या सन्मानाने एकत्रितपणे सन्मानित करण्यात आलं होतं. भारतात पहिल्यांदाच एखाद्याला हा सन्मान मिळाला होता.
परिणीतीला इन्व्हेस्टमेंट बँकिंगमध्ये तिचे करिअर करायचं होतं. बॅंकर बनण्याचं तिचं स्वप्नं होतं. पंरतु, 2009 मध्ये आलेल्या जागतिक मंदीमुळे तिची नोकरी गेली. अनेक पदव्या असूनही तिला लंडनमध्ये मनासारखा जॉब मिळाला नव्हता. अखेर तिने भारतात परतण्याचा निर्णय घेतला होता. मुंबईत परिणीतीने यशराज फिल्म्सच्या मार्केटिंग आणि पीआरच्या डिपार्टमेंटमध्ये इंटर्नशीप सुरू केली. या इंटर्नशीपच्या दरम्यानच परिणीतीला पहिल्यांदा अभिनय आणि फिल्ममेकिंगसंदर्भात शिकायला मिळालं. एकदिवस यशराजच्या ऑफिसमध्ये दिग्दर्शक मनीष शर्मा यांची परिणीतीवर नजर पडली. तिच्यातील कलाकार त्यांनी ओळखला आणि तिच्यामध्ये कलाकाराचे गुण त्यांना दिसले असावे. त्यामुळे त्यांनी तिला 2011 मध्ये आलेल्या ‘लेडीज वर्सेज रिक्की बहल’ या सिनेमासाठी कास्ट केलं. या चित्रपटात परिणीतीला सहाय्यक अभिनेत्री म्हणून संधी मिळाली. यानंतर ‘इशकजाद’ हा सोलो चित्रपट परिणीतीला मिळाला. हा परिणीतीचा खऱ्या अर्थाने डेब्यू होता. यात ती लीड अभिनेत्री होती. या चित्रपटानंतर परिणीतीने कधीच मागे वळून पाहिलं नाही.