Join us

Parineeti Chopra : परिणीती चोप्रा-राघव चढ्ढा यांच्या लग्नाचं ठिकाण झालं फायनल; ‘या’ ठिकाणी घेणार सप्तपदी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2023 15:28 IST

Parineeti Chopra and Raghav Chadha : परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी त्यांच्या लग्नाचे ठिकाण निश्चित केल्याचं नुकतेच वृत्त समोर आलं आहे.

अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे नेते राघव चढ्ढा यांच्या एंगेजमेंटनंतर आता लग्नाची जोरदार चर्चा रंगली आहे. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी त्यांच्या लग्नाचे ठिकाण निश्चित केल्याचं वृत्त समोर आलं आहे. रिपोर्टनुसार, परिणीती आणि राघव उदयपूरमधील लक्झरी हॉटेल ‘द ओबेरॉय उदयविलास’मध्ये सप्तपदी घेणार आहेत. असं म्हटलं जात आहे की, हे कपल त्यांचं लग्न पारंपारिकरित्या करणार आहेत. 

एका न्यूज पोर्टलच्या वृत्तानुसार, परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांनी त्यांच्या लग्नासाठी उदयपूरमधील पिचोला तलावाच्या किनारी असलेला द ओबेरॉय उदयविलास लक्झरी पॅलेस फायनल केला आहे. व्हायरल झालेल्या बातम्यांनुसार, परिणीती आणि राघव 2023 च्या हिवाळ्यात म्हणजेच सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत लग्न करणार आहेत. मात्र, लग्नाच्या ठिकाणापासून ते लग्नाच्या तारखेपर्यंत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

रिपोर्ट्सनुसार, परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांचा विवाह पारंपारिक रितीरिवाजांनुसार होणार आहे. असं म्हटलं जात आहे की परिणीती आणि राघव या दोघांच्या कुटुंबासाठी परंपरा आणि प्रथा खूप महत्त्वाच्या आहेत, ज्याची झलक या जोडप्याच्या एंगेजमेंटमध्येही दिसली. या कपलने ठरवलं आहे की ते जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्यांच्या साक्षीने सप्तपदी घेतील. सध्या या दोघांच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगली आहे. 

परिणीतीची चुलत बहीण प्रियांका चोप्रा हिनेही निक जोनाससोबत राजस्थानमधील एका आलिशान पॅलेसमध्ये थाटामाटात लग्न केलं होतं. इतकच नाही तर कतरिना कैफ-विकी कौशल, सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांनीही त्यांच्या लग्नासाठी राजस्थानची निवड केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :परिणीती चोप्राबॉलिवूडलग्नराजस्थान