Join us

​वर्ग मित्राने खोटारडे ठरवल्यावर परिणीती चोप्राने दिला ‘हा’ खुलासा!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2017 8:39 AM

माझी कौटुंबिक परिस्थिती कधीकाळी अतिशय हलाखीची होती, असे सांगणाºया परिणीती चोप्राला तिच्या या विधानावर खुलासा द्यावा लागला आहे. मुंबईत ...

माझी कौटुंबिक परिस्थिती कधीकाळी अतिशय हलाखीची होती, असे सांगणाºया परिणीती चोप्राला तिच्या या विधानावर खुलासा द्यावा लागला आहे. मुंबईत वुमेन सेल्फ डिफेन्स सेंटरमध्ये विद्यार्थ्यांना संबोधित करताना परिणीतीने आपल्या आयुष्याची एक वेगळीच कथा ऐकवली होती. माझ्या लहानपणी आमची परिस्थिती हलाखीची होती.  तेव्हा मी अंबाला येथील शाळेत शिकत होती.  माझा भाऊ बसमधून आणि ती सायकलवरून शाळेत जायचे. मी शाळेत सुरक्षित पोहोचले की नाही ते पाहण्यासाठी माझे बाबा माझ्या मागून शाळेपर्यंत यायचे. माझ्या वडिलांकडे गाडी होती पण लहान असल्यामुळे आम्हाला शाळेत जाण्यासाठी त्याचा वापर करू दिला जायचा नाही. मला सायकलवरून शाळेत जाणे अजिबात आवडायचे नाही. पण मी स्वावलंबी बनावे म्हणूनच त्यांनी तेव्हा हे सगळं केले होते हे मला आज कळतेय, असे परिणीती यावेळी म्हटली होती. पण परिणीतीचा एक वर्गमित्र कानू गुप्ता याला मात्र परिणीतीची ही गोष्ट पचनी पडली नव्हती. गरिबीमुळे शाळेत सायकलवरून जावे लागायचे तसेच मार्शल आर्ट शिकण्याची इच्छा असूनही पैसे नसल्यामुळे कधी शिकता आले नाही, या तिच्या विधानावर कानूने चांगलेच तोंडसुख घेतले होते. परिणीती, तुला एका चांगल्या कुटुंबाची पार्श्वभूमी असूनही तू प्रसारमाध्यमांसमोर किती खोटं बोलत आहेस? तुझ्याच शाळेचा विद्यार्थी असल्यामुळे मला तुझ्या वडिलांकडे असलेली गाडीसुद्धा आठवतेय. राहिली गोष्ट सायकलवरुन शाळेत येण्याची, तर तेव्हा तो ट्रेंडच होता. त्यामुळे ज्यांना त्यावेळी सायकलवरुन शाळेत येण्याची संधी मिळाली नाही त्यांना याची खंत वाटायची, असे कानू गुप्ताने त्याच्या एफबी पोस्टमध्ये लिहिले होते.यावर आता परिणीतीने खुलासा केला आहे.गेले काही दिवस परदेशात असल्यामुळे मी यावर काही बोलू शकले नव्हते. माझ्या म्हणण्याचा विपर्यास केला गेला. मला जो मेसेज या कार्यक्रमातून द्यायचा होता तो या वादामुळे कुठेतरी दडला जात आहे. त्यामुळेच अशा निरर्थक गोष्टींकडे लक्ष देऊ नका अशी मी विनंती करते, असे तिने आपल्या विधानात म्हटले आहे.