Join us

परिणीती चोप्राला ४ लाखांची डायमंड रिंग; अभिनेत्रीनेही राघवसाठी निवडली महागडी अंगठी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2023 18:00 IST

परिणीती चोप्राच्या आउटफिटपासून तिच्या एंगेजमेंट रिंगपर्यंत बरीच चर्चा आहे.

कलाविश्वात सध्या लग्नाचे वारे वाहत आहेत. आता अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) देखील लवकरचं विवाह बंधनात अडकणार आहे. परिणीती चोप्राने १३ मे रोजी आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा (Raghav Chadha) यांच्यासोबत साखपुडा केला आहे.  राघव - परिणीती यांचा साखरपुडा शाही थाटात पार पडला. सोशल मीडियावर त्यांच्या फोटोंचा बोलबाला आहे. परिणीती चोप्राच्या आउटफिटपासून तिच्या एंगेजमेंट रिंगपर्यंत बरीच चर्चा आहे. रिपोर्ट्सनुसार, परिणीतीच्या एंगेजमेंट रिंगची किंमत लाखोंमध्ये आहे.

 परिणीतीने साखरपुड्याचे फोटो शेअर करताच त्यांच्या अंगठ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. परिणीतीने पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये एक फोटो त्या दोघांच्या अंगठ्यांचा होता. सर्वांच्या नजरा परीच्या डायमंड रिंगवर खिळल्या होत्या, जी खूप सुंदर होती. तर राघवने सोन्याचा कार्टिअर लव्ह बँड घातला आहे. 

रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर परिणीतीच्या सुंदर एंगेजमेंट रिंगची किंमत 4 लाख रुपये आहे. परिणीतीने राघवला घातलेल्या या साध्या आणि सोबर लव्ह बँडची किंमत १.२ लाख आहे. हा लव्ह बँड संपूर्ण सोन्याचा असून त्यावर नाजूक डिझाईन आहे.

परिणीती राघव यांच्या लव्हस्टोरीबद्दल सांगायचं तर, परिणीती आणि राघव यांचं एकाच कॉलेजमध्ये शिक्षण झाले असले तरी, दोघांच्या प्रेमाची सुरुवात मात्र नुकताच झाली आहे. दोघे पंजाब येथे भेटले आणि दोघांमधील प्रेम बहरले. परिणीती तेव्हा पंजाब येथे सिनेमाचे शुटिंग करत होती. तेव्हाच दोघांची भेट झाली आणि भेटीचं रुपांतर प्रेमात झाले असे सांगण्यात येत आहे.

टॅग्स :परिणीती चोप्रा