Join us

Parineeti Chopra : “राजकारणी नवरा…”; राघव चड्ढांशी अफेअरच्या चर्चा अन् परिणीती चोप्राचा ‘तो’ व्हिडीओ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2023 10:29 IST

Parineeti Chopra, Raghav Chadha : खासदार राघव चड्ढांशी अफेअरच्या चर्चांदरम्यान परिणीतीचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे...

Parineeti Chopra, Raghav Chadha : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राच्या लग्नाची चर्चा जोरात आहे. होय, आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्ढा यांच्यासोबत परिणीती चोप्राचं नाव जोडलं जातंय. दोघंही लवकरच लग्न करणार असल्याच्याही चर्चा आहेत. काही दिवसांपूर्वी परिणीती व राघव चड्ढा मुंबईच्या एका रेस्टॉरंटबाहेर स्पॉट झालेत आणि यानंतर लगेच दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरू झाल्यात. कालपरवा परिणीती व राघव मुंबई एअरपोर्टवर एकत्र स्पॉट झालेत आणि दोघांच्या रिलेशनशिपच्या बातम्यांना आणखी जोर चढला. अद्याप परिणीती व राघव यावर काहीही बोलले नाहीत. पण चर्चांना उधाण आलं असतानाच परिणीतीचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जुन्या मुलाखतीचा परिणीतीचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आहे.

फरीदून शहरयार नावाच्या अकाउंटवरून परिणीती चोप्राचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. तिचा हा व्हिडीओ ‘हंसी तो फसी’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यानचा आहे. व्हिडीओमध्ये परिणीती सिद्धार्थ मल्होत्राबरोबर दिसत आहे.

व्हिडीओत रॅपिड फायर राउंडमध्ये परिणीतीला राजकारण्याशी लग्न करण्याबद्दल प्रश्न विचारला जातो. यावर ती म्हणते, “अनेक चांगले पर्याय आहेत. पण अडचण ही आहे की मला कोणत्याही राजकारण्याशी कधीच लग्न करायचं नाही, ” परिणीती व खासदार राघव चड्ढा यांच्या डेटिंगच्या बातम्या येऊ लागल्यानंतर साहजिकच या व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. या व्हिडीओवर अनेक चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी तिची मजाही घेतली आहे. चल झूठी, असं एका चाहत्याने लिहिलं आहे. तर आम आदमी है वो, पॉलिटीशिअन नहीं, अशी कमेंट एका युजरने केली आहे. आयुष्यात काहीही होऊ शकतं, कधीही मतं बदलू शकतात, अशा कमेंट्ही या व्हिडीओखाली पाहायला मिळत आहे.

टॅग्स :परिणीती चोप्राबॉलिवूड