अभिनेत्री परिणीती चोप्राने गेल्या वर्षी सप्टेंबर २०२३ मध्ये आम आदमी पार्टीचे नेते राघव चढ्ढा यांच्याशी लग्न केले होते. त्याच्या लग्नाला आता एक वर्षाहून अधिक काळ झाला आहे. ते अनेकदा एकत्र फिरताना दिसत आहेत. सोशल मीडियावरही ते एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करतात पाहायला मिळतात. आता हे दोघेही दिल्लीच्या रस्त्यांवर सायकल चालवताना दिसून आले आहेत.
परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये परिणीती आणि राघव राष्ट्रपती भवनासमोर सायकल चालवताना दिसत आहेत. दोघे दिल्लीच्या रस्त्यावर ताज्या हवेत मोकळा श्वास घेताना दिसले. परदेशात तर कधी मुंबईत राहिल्यानंतर परिणीती सध्या पतीसोबत सासरच्या घरी वेळ घालवत आहे.
परिणीती आणि राघव हे कायम चाहत्यांना कपलगोल्स देतात. दोघेही एकमेंकावरील प्रेम व्यक्त करण्याची एकही संधी सोडत नाहीत. परिणीतीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर अलिकडेच तिचा इम्तियाज अली दिग्दर्शित 'अमर सिंग चमकीला' हा सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. तर नुकतेच तिने स्वत:चं नवं युट्यूब चॅनेल सुरू केलं आहे. परिणीतीच्या या युट्यूब चॅनेलचं नाव Parineeti Chopraअसं आहे.