Join us

युकेत पहिली भेट भारतात बहरलं प्रेम, अशी सुरु झाली परिणीती आणि राघव चड्ढा यांची प्यारवाली लव्हस्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2023 4:49 PM

हे कपल बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत होते, पण....

परिणीती चोप्राने १३ मे रोजी आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा (Raghav Chadha) यांच्यासोबत साखपुडा केला आहे.  हे कपल बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत आहे. परिणीती एखाद्या राजकारण्याशी लग्न करेल असे चाहत्यांना वाटलं नव्हतं. कारण आधीच्या एका मुलाखतीत परिणीतीने आपण एखाद्या राजकीय व्यक्तीशी लग्न करणार नाही असं सांगिलं होतं. परिणीती आणि राघव यांची ओळख लंडनमध्ये झाली होती.  

 परिणीती चोप्रा यशराज फिल्म्ससाठी पीआर म्हणून काम करत होती आणि नंतर यशराज फिल्म्सच्या 'लेडीज वर्सेस रिकी बहल' या चित्रपटातून तिने डेब्यू केला. परिणीतीने यापूर्वी यूकेमध्ये शिकत होते. सुमारे 15 वर्षांपूर्वी, परिणीती चोप्रा यूकेमधील मँचेस्टर विद्यापीठात व्यवसाय, अर्थशास्त्र आणि वित्त विषयात पदवी अभ्यासक्रम करत होती. राघव चढ्ढाही त्याच वेळी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकत होते आणि  दोघांची ओळख तिथेच झाली.

दोघांच्या लव्हस्टोरीबद्दल सांगायचे तर राघव आणि परिणीतीच्या प्रेमकथेच्या सुरुवातीची कहाणीही खूप रंजक आहे. असे मानले जाते की ही प्रेमकहाणी गेल्या वर्षी सुरू झाली जेव्हा परिणीती एका चित्रपटाचे शूटिंग करत होती आणि राघव तिथे पोहोचले होते. परिणीती पंजाबमध्ये होती आणि 'चमकिला'चे शूटिंग करत होती. मित्र असल्याने राघवही परीला भेटायला तिथे पोहोचले. दोघे भेटले आणि दोघांमधील प्रेम बहरले. 

राघव आणि परीने कधीच आपल्या नात्याची कबुली दिली नाही. दोघे डिनरवर स्पॉट झाले असले तरी कधी एअरपोर्टवर तर कधी मोहालीत आयपीएल मॅच पाहताना. पण त्यांनी आपलं नातं कधीच अधिकृत केलं नाही.

टॅग्स :परिणीती चोप्रा