Join us

Parineeti Chopra – Raghav Chadha : परिणीती चोप्रा - राघव चड्ढाचा पार पडणार शाही विवाहसोहळा, लग्नाबद्दल मोठी माहिती आली समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2023 12:07 PM

Parineeti Chopra – Raghav Chadha : अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा साखरपुडा नुकताच पार पडला. त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

कलाविश्वात सध्या लग्नाचे वारे वाहत आहेत. आता अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) देखील लवकरचं विवाह बंधनात अडकणार आहे. परिणीती चोप्राने १३ मे रोजी आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा (Raghav Chadha) यांच्यासोबत साखपुडा केला आहे. साखरपुड्यानंतर आता ती विवाहबद्ध कधी होणार, हे जाणून घेण्यासाठी सर्व उत्सुक आहेत. साखरपुड्याप्रमाणेच चोप्रा – चड्ढा कुटुंबाने परिणीती – राघव यांच्या लग्नाबद्दल मौन बाळगले आहे. सध्या बॉलिवूड आणि राजकीय वर्तुळातही परिणीती आणि राघव यांच्या लग्नाची चर्चा रंगताना दिसत आहे. दरम्यान आता साखरपुड्यानंतर परिणीती आणि राघव यांच्या लग्नाबद्दल मोठी माहिती समोर आली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, राघव - परिणीती यांचा विवाह शाही थाटात होणार आहे. त्यांचे लग्न रॉयल होणार आहे. लग्नात फक्त जवळच्या व्यक्तींना निमंत्रित करण्यात येणार आहे. हिवाळ्यात राघव-परिणीती विवाहबंधनात अडकणार असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. राघव आणि परिणीती यांचे लग्न ऑक्टोबर महिन्यात होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दोघांच्या लग्नाला प्रियांका चोप्रा देखील उपस्थित राहणार आहे. तिच्याशिवाय कतरिना कैफ, विकी कौशल, सिद्धार्थ मल्होत्रा, किआरा आडवाणी उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र लग्नाबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

गेल्या अनेक दिवसांपासून राघव आणि परिणीती यांच्या नात्याची चर्चा सुरु होती. पण दोघांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी नात्याबद्दल मौन बाळगलं होतं. अखेर शनिवारी दिल्ली येथील कनॉट प्लेस येथील कपूरथला हाऊस याठिकाणी परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा साखरपुडा पार पडला.

परिणीती राघव यांच्या लव्हस्टोरीबद्दल सांगायचं तर, परिणीती आणि राघव यांचं एकाच कॉलेजमध्ये शिक्षण झाले असले तरी, दोघांच्या प्रेमाची सुरुवात मात्र नुकताच झाली आहे. दोघे पंजाब येथे भेटले आणि दोघांमधील प्रेम बहरले. परिणीती तेव्हा पंजाब येथे सिनेमाचे शुटिंग करत होती. तेव्हाच दोघांची भेट झाली आणि भेटीचं रुपांतर प्रेमात झाले असे सांगण्यात येत आहे.

टॅग्स :परिणीती चोप्रा