परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नाचे प्री-वेडिंग फंक्शन्स सुरु झाले आहेत. दिल्लीत परिणीती-राघव यांचा मेहंदी सोहळा पार पडला.ज्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा गुरुद्वाराचा फोटो आहे ज्यात परिणिती तिच्या हातावर मेहंदी पाहायला मिळाली. परिणीती आणि राघवच्या लग्नाचे काही फंक्शन दिल्लीत होत आहेत. २४ सप्टेंबर रोजी उदयपूरमध्ये लग्नगाठ बांधणार आहेत. त्यांच्या लग्नाची तयारी जोरात सुरू झाली आहे. दोघे उदयपूरमध्ये लग्न करणार आहेत. परिणीती आणि राघवच्या लग्नाचा चुडा सोहळा आणि सेहराबंदी कधी होणार हे जाणून घेऊया.
परिणीती आणि राघवचे लग्न खूप ग्रँड होणार आहे. या कपलच्या लग्नात कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रांव्यतिरिक्त बॉलिवूड सेलिब्रिटी आणि राजकीय व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. अशा परिस्थितीत पाहुण्यांच्या स्वागतासाठी शाही व्यवस्थाही करण्यात आली आहे. परिणीती आणि राघवच्या लग्नाचे सर्व विधी लीला पॅलेस आणि ताज पॅलेस हॉटेलमध्ये पार पडणार आहेत.
२३ आणि २४ सप्टेंबरचं फंक्शन२३ सप्टेंबरला परिणिती चोप्राचा चुडा भरण्याचा कार्यक्रम सकाळी १० वाजता पार पडणार आहे. या विधीला परी जे चुडा सेरेमनी असे नाव देण्यात आले आहे.२३ सप्टेंबरला पाहुण्यांसाठी 90 च्या थीमवर आधारित पार्टी संध्याकाळी 7 वाजल्यापासून आयोजित केली जाईल.२४ सप्टेंबरला दुपार १ वाजता राघव चड्डा यांना सेहराबंदला जाईल. २४ला वाजत गाजत वऱ्हात घेऊन राघव लग्नाच्या ठिकाणी पोहोचतील. २४सप्टेंबरला दुपार ३.३०च्या सुमारास जयमाला होतील आणि त्यानंतर चारनंतर दोघे फेरे घेतील. २४ ला संध्याकाळी ६.३०नंतर परिणीतीची पाठवणी होईल. परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा रात्री ८ वाजता लीला पॅलेस हॉटेलमध्ये त्यांच्या लग्नाचे ग्रँड रिसेप्शन देणार आहेत.