ती म्हणते त्या चर्चा खोट्या, लग्नाच्या चर्चांवर दिली परिणीती चोप्राने 'ही' प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2018 11:14 AM2018-12-17T11:14:55+5:302018-12-17T11:24:39+5:30
2018 हे वर्ष बॉलिवूडसाठी लग्नीसराईचे ठरले असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. बॉलिवूड आणि छोट्या पडद्यावरील अनेक सेलिब्रेटी लग्नाच्या बेडीत अडकले.
2018 हे वर्ष बॉलिवूडसाठी लग्नीसराईचे ठरले असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. बॉलिवूड आणि छोट्या पडद्यावरील अनेक सेलिब्रेटी लग्नाच्या बेडीत अडकले. दीपिका पादुकोण-रणवीर सिंग आणि प्रियांका चोप्रा- निक जोनास नुकतेच विवाह बंधनात अडकले आहेत. प्रियांकाची बहीण परिणीती चोप्रा ही लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याची माहितीसमोर येतेय. परिणीती चरित देसाईसोबत लग्न करणार असल्याचे समजतेय. प्रियांकाच्या प्री-वेडिंगपासून लग्नापर्यंत प्रत्येक फंक्शनमध्ये चरित हजर होता.
ABSOLUTELY BASELESS AND UNTRUE!! I will happily announce whenever I am getting married! @MumbaiMirrorpic.twitter.com/JJGb61XbGy
— Parineeti Chopra (@ParineetiChopra) December 15, 2018
परिणीती स्वत: या गोष्टी फेटाळल्या आहेत. लग्नाच्या चर्चेमध्ये कोणतेच तथ्य नसल्याचे तिने ट्वीट करून सांगितले आहे. परिणीतीने सांगितले की, ज्यावेळी मी लग्न करणार असेन तेव्हा आनंदाने त्याची मी घोषणा करेन.
चरितने 'अग्निपथ'साठी असिस्टेंट दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. परिणीती आणि चरितची ओळख 2016च्या ड्रीम टीम टूर दरम्यान झाली. या टूरचे बिहाइंड द सीन्स व्हिडिओ शूट करण्याची जबाबदारी चरितकडे सोपवण्यात आली होती. याचदरम्यान चरित आणि परी यांची मैत्री जमली होती. भारतात परतल्यानंतरही ही मैत्री कायम राहिली आणि पुढे इतकी बहरली की, दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. चरित आणि परिणीती हे २०१७ पासून एकमेकांना डेट करत आहेत.
परिणीती लवकरच 'केसरी'मध्ये अक्षय कुमारसोबत दिसणार आहे. या सिनेमाच्या शूटिंगसाठी सध्या परी राजस्थानमध्ये आहे. परिणीतीची यातील भूमिका छोटीशी असल्याची माहिती आहे. पण सिनेमा ऐतिहासिक असल्यामुळे तिनं स्वीकारल्याचे खुलासा परिणीतीने केला आहे. बॉम्बे टाइम्सशी बोलताना ती म्हणाली होती, ''मला एखाद्या ऐतिहासिक सिनेमात मोठी भूमिका करायचीय. पण आता मी सुरुवात केसरीपासून करणार आहे.''