2018 हे वर्ष बॉलिवूडसाठी लग्नीसराईचे ठरले असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. बॉलिवूड आणि छोट्या पडद्यावरील अनेक सेलिब्रेटी लग्नाच्या बेडीत अडकले. दीपिका पादुकोण-रणवीर सिंग आणि प्रियांका चोप्रा- निक जोनास नुकतेच विवाह बंधनात अडकले आहेत. प्रियांकाची बहीण परिणीती चोप्रा ही लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याची माहितीसमोर येतेय. परिणीती चरित देसाईसोबत लग्न करणार असल्याचे समजतेय. प्रियांकाच्या प्री-वेडिंगपासून लग्नापर्यंत प्रत्येक फंक्शनमध्ये चरित हजर होता.
परिणीती लवकरच 'केसरी'मध्ये अक्षय कुमारसोबत दिसणार आहे. या सिनेमाच्या शूटिंगसाठी सध्या परी राजस्थानमध्ये आहे. परिणीतीची यातील भूमिका छोटीशी असल्याची माहिती आहे. पण सिनेमा ऐतिहासिक असल्यामुळे तिनं स्वीकारल्याचे खुलासा परिणीतीने केला आहे. बॉम्बे टाइम्सशी बोलताना ती म्हणाली होती, ''मला एखाद्या ऐतिहासिक सिनेमात मोठी भूमिका करायचीय. पण आता मी सुरुवात केसरीपासून करणार आहे.''