‘लाईफ इन मेट्रो2’च्या सीक्वलमधून परिणीती चोप्रा आऊट झाली आहे. अलीकडे परिणीतीचा ‘नमस्ते इंग्लंड’ हा चित्रपट रिलीज झाला होता. तथापि बॉक्सआॅफिसवर हा चित्रपट फार कमाल दाखवू शकला नाही. या चित्रपटाच्या रिलीजपूर्वीच परिणीतीचे नाव ‘लाईफ इन मेट्रो2’साठी फायनल झाले होते. पण आता ‘लाईफ इन मेट्रो2’मधून परिणीती आऊट झाली आहे. तारखांचा मेळ जमत नसल्याने परिणीतीला हा चित्रपट सोडावा लागल्याची खबर आहे. तूर्तास परिणीती अक्षय कुमारच्या ‘केसरी’ आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या ‘जबरिया जोडी’ या दोन चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. या दोन्ही चित्रपटांमुळे ‘लाईफ इन मेट्रो2’साठी तारखा देणे परिणीतीला अशक्य झाले आणि सरतेशेवटी तिला हा चित्रपट सोडावा लागला. आता परिणीतीच्या जागेवर या चित्रपटात कुण्या अभिनेत्रीची वर्णी लागते, ते लवकरचं कळणार आहे.या वर्षाच्या सुरूवातीला ‘केसरी’च्या सेटवर आग लागली होती. या आगीत सेटचे प्रचंड नुकसान झाले होते. त्यामुळे चित्रपटाचे काही सीन्स नव्याने शूट करावे लागणार आहेत. डेक्कन क्रॉनिकलने दिलेल्या वृत्तानुसार, या चित्रपटाची अक्षय कुमार व अन्य कास्टचे १५ दिवसांचे शूटींग अद्याप बाकी आहे आणि यासाठी सेट पुन्हा उभारण्याचे काम सुरू आहे. एका सूत्राने सांगितले की, पावसाळ्यात आम्ही हे शूटींग करू शकलो नाहीत. कारण आऊटडोअर शूटींग होते़. आता अक्षय कुमार आणि अन्य कलाकारांच्या तारखांची आम्हाला प्रतीक्षा आहे.‘लाईफ इन मेट्रो2’ हा चित्रपट २००७ मध्ये आलेल्या ‘लाईफ इन मेट्रो’चा सीक्वल आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागात इरफान खान, कोंकणा सेन, कंगना राणौत, शिल्पा शेट्टी, शरमन जोशी महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसले होते. अनुराग बासू दिग्दर्शित या चित्रपटाला प्रेक्षकांची चांगली पसंती लाभली होती.