Join us

विनामेकअप सायना नेहवालच्या बायोपिकमध्ये झळकणार परिणीती चोप्रा, तर बॅडमिंटनच्या प्रशिक्षणासाठी जाणार लंडनला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2019 4:02 PM

लंडनमध्ये पाच महिन्यांचे प्रशिक्षण ती घेणार आहे. ऑक्टोबरपर्यंत परिणीती प्रशिक्षण पूर्ण करून सिनेमाच्या शूटिंगला सुरूवात करणार आहे. 

फुलराणी सायना नेहवालवर बायोपिक बनतोय हे तर आता सा-यांनाच माहिती आहे. सिनेमात सायनाची भूमिका आधी श्रद्धा कपूर साकारणार होती. मात्र बॅटमिनटनमध्ये परफेक्शन नव्हते. श्रद्धाला सायनाचे बॅडमिंटन स्किल जमत नव्हते. त्यामुळे अनेक शूटिंगच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. सायना ही श्रद्धाच्या परफॉर्मन्सवर फारशी खुश नसल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे श्रद्धाला हा सिनेमा सोडावा लागला होता.श्रद्धा नंतर परिणीती चोप्राची या भूमिकेसाठी वर्णी लागली. परिणीतीही या भूमिकेसाठी प्रचंड मेहनत घेत आहे.बायोपिक सिनेमातील भूमिकेसाठी परिणीतीने खडतर प्रशिक्षणही घेत आहे. विशेष म्हणजे खास बॅडमिंटन ट्रेनिंगसाठी परिणीती लंडनला जाणार आहे.

प्रत्येक भूमिकेसाठी कलाकार हे आपल्याला मेकअपमध्ये दिसतात, मात्र यासाठी परिणीती अपवाद ठरली आहे. या भूमिकेसाठी परिणीती मेकअपसुद्धा करणार नाही. विनामेकअपच परिणीती सिनेमाचे शूटिंग करणार असल्याचे समजतंय. आता लंडनमध्ये पाच महिन्यांचे प्रशिक्षण ती घेणार आहे. ऑक्टोबरपर्यंत परिणीती प्रशिक्षण पूर्ण करून सिनेमाच्या शूटिंगला सुरूवात करणार आहे. श्रद्धा सारखी परिस्थिती परिणीतीची होवू नये त्यामुळे परिणीती मेकअपवर जास्त लक्ष न देता सायनासारखे बोलणे, चालणे आणि खेळण्यावर ती लक्ष देणार आहे. 

 

परिणीती चोप्राला आजही होतो ‘त्या’ एका नकाराचा पश्चाताप !

परिणीतीला आजही हा एक चित्रपट नाकारल्याचा पश्चाताप होतो. अगदी राहून राहून होतो. हा चित्रपट कुठला तर ‘पीकू’.  ‘पीकू’ न केल्याचा मला आजही पश्चाताप होतो. अर्थात मी स्वत: हा चित्रपट सोडला नव्हता. माझ्यामते काहीतरी कन्फ्युजन झाले होते. हा चित्रपट माझ्याकडे आला तेव्हा मी दुस-या एका चित्रपटात बिझी होते. त्यामुळे मी  ‘पीकू’ला नकार दिला आणि मीच माझे नुकसान करून बसले, असे परिणीती म्हणाली.परिणीतीने हा चित्रपट नाकारल्यावर यात दीपिका पादुकोणची वर्णी लागली.  ‘पीकू’मध्ये तिने अमिताभ बच्चनच्या मुलीची भूमिका साकारली आहे. सुजीत सरकार दिग्दर्शित हा चित्रपट हिट ठरला होता. यातील दीपिकाच्या अभिनयाचेही प्रचंड कौतुक झाले होते.

टॅग्स :परिणीती चोप्रासायना नेहवाल