बॉलिवूडची बबली गर्ल परिणीती चोप्रा तिच्या आगामी प्रोजेक्टमध्ये बिझी आहे. या चित्रपटाचं शूटिंग लंडनमध्ये होत आहे. परिणीतीचा आगामी चित्रपट हॉलिवूड चित्रपट द गर्ल ऑन दि ट्रेनचा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूक सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. हा लूक पाहून अंगावर काटा येतो आहे.
पॉल हॉकिन्सची प्रसिद्ध कादंबरी 'द गर्ल ऑन द ट्रेन'वर बनलेला अभिनेत्री एमिली ब्लंटवर चित्रीत झालेला हॉलिवूडपट 'द गर्ल ऑन द ट्रेन'चा हिंदी रिमेक बनत आहे. या चित्रपटाचं शूटिंग सध्या सुरू आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित झाला. यामध्ये परिणीती चोप्रा बाथटबमध्ये बसलेली पहायला मिळते आहे. या फोटोमध्ये तिच्या डोक्याला मार लागलेला असून चेहऱ्याला रक्त व काळवंडलेला दिसतो आहे. डोळ्यात काजळ पसरलेलं दिसतं आहे. हा फोटो थरारक वाटतो आहे.
याशिवाय ती भुज: दि प्राइड ऑफ इंडियामध्येही काम करताना दिसणार आहे.