Join us

म्हणून परिणीती चोप्रा करणार इंग्लंडमध्ये ट्रेनमधून प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2019 1:33 PM

परिणीती चोप्रा  'द गर्ल ऑन द ट्रेन’च्या रिमेकसाठी जुलैला इंग्लंडला रवाना होणार आहे. या सिनेमात परी घटस्फोटीत महिलेच्या भूमिकेत दिसणार असून हरवलेल्या व्यक्तीच्या शोध घेण्यासाठी सहभागी असते.

ठळक मुद्दे हॉलिवूडपटात एमिली ब्लंटने साकारलेली भूमिका परिणीती साकारणार आहे'द गर्ल ऑन द ट्रेन’च्या रिमेकसाठी परिणीती जुलैला इंग्लंडला रवाना होणार आहे.

परिणीती चोप्रा  'द गर्ल ऑन द ट्रेन’च्या रिमेकसाठी जुलैला इंग्लंडला रवाना होणार आहे. या सिनेमात परी घटस्फोटीत महिलेच्या भूमिकेत दिसणार असून हरवलेल्या व्यक्तीच्या शोध घेण्यासाठी सहभागी असते. ती हॉलिवूडपटात एमिली ब्लंटने साकारलेली भूमिका परिणीती साकारणार आहे.  

दोन महिने परिणीती इंग्लंडमधील खऱ्याखुऱ्या लोकेशन्सवर शूटिंग करणार आहे. परी ट्रेनमधून प्रवास करणार असून प्रवाशांसोबत शूटदेखील करणार आहे.

चित्रपट निर्मात्यांना हा चित्रपट अधिक जीवंत आणि वास्तववादी बनवायचा असल्याने असे करण्यात येणार आहे. या चित्रपटाच्या मूळ कथानकात ट्रेनचे अनन्यसाधारण महत्व असल्यामुळे हा चित्रपट ट्रेनमध्येच चित्रीत करण्यात येणार आहे.  सूत्रांनी सांगितले, ट्रेनमधल्या त्या प्रवासादरम्यान परिणीतीच्या पात्राने अनुभवलेले रोमांचक क्षण या चित्रपटातून आपल्यासमोर येणार आहेत. हे क्षण वास्तववादी दिसण्यासाठी परिणीतीला खरोखरच्या ट्रेन्समध्ये सामान्य प्रवाशांसारखा प्रवास करावा लागणार आहे. या चित्रपटात ट्रेन हेच जणू एक प्रमुख पात्र असल्याने प्रत्येक क्षण आम्ही परफेक्ट टिपण्याचा प्रयत्न करीत आहोत. चित्रपटातल्या क्षणांसाठी आणि कथानकासाठी परिणितीला ट्रेनच्या प्रवासात नेमके काय आणि कसे अनुभव येतात, हे फार महत्वाचे ठरते. 

इशकजादे, हसी तो फसीसारख्या सिनेमातून परिणितीने आपलं कौशल्य दाखवले आहे. 'द गर्ल ऑन द ट्रेन' चित्रपटाची कथा २०१५ साली सर्वाधिक विक्री झालेल्या पॉला हॉकिन्सच्या पुस्तकावर आधारित असून यामध्ये एका घटस्फोटीत महिलेची कथा रेखाटण्यात आली आहे. या चित्रपटातील या भूमिकेसाठी एमिलीचे समीक्षकांनी खूप कौतूक केले होते. परिणीती चोप्रा नव्या अंदाजात या हॉलिवूडपटाच्या रिमेकमध्ये पहायला मिळणार आहे. त्यामुळे तिचे चाहते तिला या भूमिकेत पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.

टॅग्स :परिणीती चोप्रा