Join us

शाहरूख खानच्या चुलत बहिणीचे निधन, या आजाराने होती ग्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2020 11:48 AM

नूर जहां शाहरुख खानला भेटण्यासाठी दोनदा भारतात आल्या होत्या.

ठळक मुद्दे नूर जहां राजकारणात सक्रीय होत्या.

बॉलिवूडचा किंगखान शाहरूख खान याच्या चाहत्यांसाठी एक दु:खद बातमी आहे. होय, शाहरूखची चुलत बहीण नूर जहां यांचे मंगळवारी निधन झाले. नूर जहां यांचा लहान भाऊ मन्सूर याने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.  नूर जहांचे शेजारी मियां जुल्फिकार यांनीही त्यांच्या निधनाच्या बातमीला दुजोरा दिला. नूर जहां दीर्घकाळापासून कॅन्सरला झुंज देत होत्या.

पाकिस्तानी वृत्तवाहिन्यांनी याबाबतचे वृत्त दिले आहे. नूर जहां शाहरुख खानच्या वडिलांच्या चुलत भावाची मुलगी आहे.   नूर जहां या पेशावर येथील मोहल्ला शाह वली कतल भागात राहत होत्या.

 नूर जहां राजकारणात सक्रीय होत्या. 2018 मध्ये पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यामुळे त्या अचानक चर्चेत आल्या होत्या. अर्थात यानंतर त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला होता. त्या नगरसेवक होत्या. नूर जहां शाहरुख खानला भेटण्यासाठी दोनदा भारतात आल्या होत्या. दोन्ही कुटुंबांचे एकमेकांसोबत चांगले संबंध आहेत.लहानपणी शाहरुख खानही आई- वडिलांसोबत पेशावरमध्ये नातेवाईकांना भेटायला गेला होता. 

टॅग्स :शाहरुख खान