Pathaan Box Office Collection Day 4 : शाहरुख खान (Shah Rukh Khan) व दीपिका पदुकोणचा ( Deepika Padukone) ‘पठाण’ चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. ‘पठाण’ हा सिनेमा गत २५ जानेवारीला चित्रपटातगृहांत धडकला आणि रिलीज होताच या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर आग लावली. शाहरूखचा सिनेमा त्सुनामीच्या वेगाने कमाई करतोय. अगदी रिलीजनंतरच्या चारच दिवसांत भारतीय बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने २०० कोटींचा आकडा पार केला आहे. विदेशात हा आकडा ४०० कोटींवर गेला आहे.
‘पठाण’ने रिलीजच्या पहिल्या दिवशी ५५ कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी ६८ कोटींचा बिझनेस केला. तिसऱ्या दिवशी ३८ कोटी कमावले तर चौथ्या दिवशी म्हणजे काल शनिवारी सुमारे ५२ कोटींचा गल्ला जमवला. याचबरोबर या सिनेमाने २०० कोटींचा आकडा पार केला. केवळ चारच दिवसांत ‘पठाण’ने डबल सेच्युरी मारली आहे. आज रविवारी सुट्टी आहे आणि ‘पठाण’ला याचा चांगला फायदा होणार आहे. शनिवारसारखाच रविवारही हा सिनेमा गर्दी खेचणार हे नक्की आहे.
जगातही धुमाकूळ‘पठाण’चा जादू केवळ भारतात नाही तर जगभरात पाहायला मिळतेय. विदेशातही ‘पठाण’ तुफानी कमाई करतो. ‘पठाण’ने वर्ल्डवाईड ४०० कोटींची कमाई केली आहे. होय, फक्त चारच दिवसांत ४०० कोटी कमावले आहेत. हे आकडे पाहून शाहरूख हाच बॉलिवूडचा बादशाह आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. शाहरूखने सुमारे चार वर्षांनंतर कमबॅक केलं आणि थिएटर्स गर्दीने फुलून गेलेत. कोरोना महामारीच्या काळात बंद पडलेले अनेक सिंगल स्क्रीन चित्रपटगृह पुन्हा एकदा सुरू झालेत.
तेलगू, तामिळ व्हर्जनची कमाईभारतीय सिनेमाच्या इतिहासात ‘पठाण’ हा सर्वात मोठी ओपनिंग करणारा सिनेमा ठरला आहे. ‘पठाण’ने पहिल्या दिवशी ५७ कोटी कमावले. यापैकी ५५ कोटी एकट्या हिंदी व्हर्जनने कमावले. तेलगू व तामिळ व्हर्जनने २ कोटींचा बिझनेस केला. तीन दिवसांत तामिळ व तेलगू व्हर्जनने एकूण ५.७५ कोटींचा बिझनेस केला.