Join us

Pathaan Box Office : 1000 कोटींची कमाई करून 'पठान'नं रचला इतिहास, तरी या 4 चित्रपटांच्या तुलनेत मागेच

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2023 11:46 AM

किंग खानच्या या चित्रपटाने भलेही 1000 कोटींचा आकडा पार केला असेल, पण तरीही हा चित्रपट अद्यापही हायएस्ट कलेक्शनच्या बाबतीत काही टॉप चित्रपटांच्या तुलनेत पिछाडीवरच आहे.

शाहरुख खानच्या 25 जानेवारीला रिलीज झालेल्या पठान या चित्रपटाने इतिहास रचत वर्ल्डवाईड बॉक्स ऑफिसवर 1000 कोटींचा गल्ला जमवला आहे. पठान हा रिलीजच्या पहिल्या फेजमध्ये वर्ल्डवाईड 1000 कोटी रुपयांची कमाई करणारा पहिला हिंदी चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाचे भारतातील नेट बॉक्स ऑफिस कलेक्शन 516.92 कोटी रुपये झाले आहे. 

या 4 चित्रपटांच्या तुलनेत मागेच -पठान हा शाहरुख खानच्या कारकिर्दितील सर्वात मोठा चित्रपट बनला आहे. या चित्रपटातून त्याने 4 वर्षांनंतर धडाक्यात पुनरागमन केले. प्रदर्शित झाल्यानतंर 27व्या दिवशीही चत्रपटाची कमाई सुरूच आहे. किंग खानच्या या चित्रपटाने भलेही 1000 कोटींचा आकडा पार केला असेल, पण तरीही हा चित्रपट अद्यापही हायएस्ट कलेक्शनच्या बाबतीत काही टॉप चित्रपटांच्या तुलनेत पिछाडीवरच आहे. तर जाणून घेऊयात त्या चार चित्रपटांसंदर्भात ज्यांचा विक्रम शाहरुखला अद्यापही तोडता आलेला नाही.

RRR -एसएस राजामौली यांचा चित्रट आरआरआरने ग्लोबल बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. राम चरण, ज्युनिअर एनटीआर यांचा हा चित्रपट आता ऑस्करमध्येही धमाल करण्यासाठी रेडी आहे. या चित्रपटाचे वर्ल्डवाईड कलेक्शन 1170 कोटी आहे.

दंगल -आमिर खानच्या दंगल चित्रपटाचे भारतातील कलेक्शन किंग खानने क्रॉस केले आहे. पण या चित्रपटाच्या वर्ल्डवाईड कलेक्शनपर्यंत पोहोचणे काहीसे अवघड आहे. दंगलने वर्ल्डवाईड 2070.3 कोटी रुपये कमावले आहेत.

बाहुबली 2 -प्रभासचा चित्रपट बाहुबलीने अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत. या चित्रपटाचे वर्ल्डवाईड कलेक्शन 1788.06 कोटी एवढे आहे.

केजीएफ 2 -केजीएफ 2 या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर हंगामा केला होता. या चित्रपटाने वर्ल्डवाईड 1208 कोटी रुपयांचे कलेक्शन केले. या चित्रपटामुळे यश पॅन इंडिया स्टार बनला. लोकांना याच्या तिसऱ्या पार्टचीही प्रतीक्षा आहे.

टॅग्स :पठाण सिनेमाशाहरुख खानबॉलिवूड