बॉलीवूडचा 'बादशाह' शाहरुख खान यानं मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास आपल्याला फोन केल्याची माहिती आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी दिली. त्यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. मुख्यमंत्री सरमा म्हणाले की, गुवाहाटीमध्ये 'पठाण'च्या विरोधात आंदोलन करण्यात आले होते, ज्यासाठी शाहरुख खानने त्यांना फोन करून चिंता व्यक्त केली आहे.
सरमा यांनी सांगितले की, त्यांनी शाहरुखला या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे. महत्वाची बाब अशी की एका दिवसापूर्वी 'पठाण'च्या निषेधाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना हिमंम सरमा यांनी चक्क कोण शाहरुख खान? त्याच्या वक्तव्याची जोरदार चर्चा होत आहे, असं म्हटलं होता. आता शाहरुखनंच फोन केल्याची माहिती देत सरमा यांनी सर्वांना सुखद धक्का दिला आहे.
पठाण सिनेमा पाहण्यास सरमा यांनी केला होता विरोधगुवाहाटीमध्ये शनिवारी पत्रकार परिषदेदरम्यान आसामच्या मुख्यमंत्र्यांनी शाहरुखचा 'पठाण' चित्रपट पाहण्यास नकार दिला होता. एका प्रश्नाच्या उत्तरात सरमा यांनी चक्क कोण आहे शाहरुख खान? मला त्याच्याबद्दल किंवा चित्रपटाबद्दल काहीच माहिती नाही. शाहरुखने मला फोन केला नाही, पण जर त्याने फोन केला तर मी या प्रकरणाची चौकशी करेन, असं म्हटलं होतं.
सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित 'पठाण' हा चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. २० जानेवारी रोजी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गुवाहाटीच्या नारगी येथे सिनेमा हॉलची तोडफोड केली. यात शाहरुख खानची पोस्टर्स जाळली गेली. या सिनेमा हॉलमध्ये २५ जानेवारी रोजी 'पठाण'चं स्क्रिनिंग होणार आहे.