Pathaan Movie : बॉलिवुडचा किंग शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) पठाणची रिलीज डेट जवळ येत आहे. चाहत्यांची उत्सुकता तर शिगेला पोहोचली आहे. सेलिब्रिटींचे चाहते म्हणलं की काही ना काही भन्नाट करणारच. त्यात शाहरुख ४ वर्षांनी मोठ्या पडद्यावर दिसणार असल्याने एसआरके च्या फॅन्सचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. पठाणचे प्रिबुकिंग तर फुल झाले आहेत. दरम्यान सांगलीकरांचा नादच खुळा. सांगलीतील एसआरकेच्या (SRK) चाहत्यांनी अख्खं ऑडिटोरियमच (Auditorium) बुक केलंय.
शाहरुख खानने काल ट्विटरवर AskSrk अंतर्गत चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. दरम्यान सांगलीच्या SRK's Vasim या फॅनक्लबने एक फोटो शेअर केला. यात तीन चाहते पठाण च्या पोस्टरसमोर उभे आहेत. या तिघांच्याही हातात सिनेमाच्या तिकिटांची साखळीच आहे. काहीशे तिकीटं तर यांच्या हातातच दिसत आहेत. 'सर आम्ही पूर्ण ऑडीटोरियमच बुक केलंय. आम्ही सांगली SRK Universe पठाण बघण्यासाठी सज्ज आहोत.' असे ट्वीट चाहत्यांनी केले आहे.
सांगलीकरांच्या या ट्वीटला शाहरुखनेही रिप्लाय दिला आहे. किंग खान म्हणतो, 'खूप आभार आणि देव तुमचं भलं करो. तुम्हाला सिनेमा नक्कीच आवडेल.'
पठाण’चं ॲडव्हान्स बुकिंग सुरू झालेलं आहे आणि त्याला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहेत. या चित्रपटात दीपिका पादुकोण (Deepika Padukone) अॅक्शन मोडमध्ये आहे. जॉन अब्राहम (John Abraham) नकारात्मक भूमिकेत दिसणार आहेत. डिंपल कपाडिया (Dimple Kapadiya) आणि आशुतोष राणासारखे (Ashutosh Rana) कलाकारही यात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. ‘पठाण’ २५ जानेवारी रोजी चित्रपटगृहात धडकणार आहे.