Join us

Pathaan : 'बेशरम रंग'चा वाद मिटेना, त्यातच 'पठाण'च्या दुसऱ्या गाण्याचा फर्स्ट लूकही आला.... तुम्ही पाहिलात?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2022 5:45 PM

पठाणच्या दुसऱ्या गाण्याचे पोस्टर रिलीज झाले आहे. हे नवीन गाणेही कोणता वाद निर्माण करणार नाही ना हे बघावे लागेल.

Pathaan : शाहरुख खानपठाण सिनेमातून ४ वर्षांनी चाहत्यांसमोर येतोय. मात्र पठाणवर बॉयकॉटची टांगती तलवार आहे. पठाणच्या पहिल्या गाण्यातील दीपिकाच्या भगव्या बिकीनीवरुन चांगलाच गदारोळ झाला. आता दुसऱ्या गाण्याचे पोस्टर रिलीज झाले आहे. हे नवीन गाणेही कोणता वाद निर्माण करणार नाही ना हे बघावे लागेल.

'झुमे जो पठाण' (Jhoome jo Pathaan) नवीन गाणे 

पठाणमधलं दुसरं गाणं 'झुमे जो पठाण' (Jhoome jo Pathaan)  हे लवकरच रिलीज होणार आहे. त्याचा फर्स्ट लुक सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. यात शाहरुख खान पांढरा शर्ट ब्लॅक जीन्स, गॉगल आणि केस बांधलेले अशा लुक मध्ये दिसतोय. शाहरुखचा वेगळाच स्वॅग यात दिसून येतोय. तर दीपिका यातही बोल्ड लुकमध्ये दिसत आहे.ब्राऊन टॉप ब्लॅक शॉर्टस, छोटे केस, इअररिंग्स या लुकमध्ये दीपिका हॉट दिसतेय.

आता या नवीन गाण्याची उत्सुकता नक्कीच ताणली आहे. या नवीन गाण्याच्या पोस्टरवर नेटकरी आत्ताच तुटून पडलेत. अभिनय कमी आणि फालतुगिरी जास्त आहे अशी प्रतिक्रिया एकाने दिली आहे.   बेशरम रंग गाण्यामुळे गदारोळ झालाच आता नवीन गाण्याला प्रेक्षक आणि नेटकरी स्वीकारतात का हे बघावे लागेल. 

Pathaan Movie : 'मग तो शाहरुख खान का असेना..' हिंदू संघटनेनंतर मुस्लिम संघटनांचाही 'पठाण' ला विरोध

२५ जानेवारी रोजी पठाण चित्रपटगृहात प्रदर्शित होतोय. चित्रपट रिलीज करु देणार नाही असा इशाराच मेकर्सला देण्यात आलाय. आता हा वाद मिटणार की आणखी चिघळणार हे लवकरच कळेल. 

टॅग्स :पठाण सिनेमाशाहरुख खानदीपिका पादुकोण