Pathaan : वादात सापडूनही 'पठाण'चे OTT अधिकार विकले इतक्या कोटींना, आकडा वाचून व्हाल थक्क
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2022 05:44 PM2022-12-24T17:44:41+5:302022-12-24T17:45:17+5:30
शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) यांचा चित्रपट 'पठाण' सध्या खूप चर्चेत आहे.
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) यांचा चित्रपट 'पठाण' सध्या खूप चर्चेत आहे. 'पठाण' २५ जानेवारी २०२३ रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे, परंतु त्याआधीच तो गाण्यांवरून वादात सापडला आहे. दरम्यान, 'पठाण'बाबत एक मोठे अपडेट समोर आली आहे. वास्तविक, रिलीजपूर्वीच 'पठाण'चे ओटीटी हक्क करोडोंमध्ये विकले गेले आहेत.
'पठाण'च्या ओटीटी रिलीजबाबत मोठी माहिती समोर आली आहे. रिपोर्ट्सनुसार, 'पठाण' मार्चच्या अखेरीस किंवा एप्रिलच्या सुरुवातीला OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होऊ शकतो. चित्रपटाच्या ओटीटी रिलीजबाबत सध्या कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. परंतु मीडिया रिपोर्ट्सनुसार, ग्लोबल ओटीटी अॅमेझॉन प्राइम व्हिडिओने त्याचे डिजिटल स्ट्रीमिंग अधिकार २०० कोटी रुपयांमध्ये आरक्षित केले आहेत.
शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांच्या 'पठाण' चित्रपटाचा वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे. चित्रपटातील 'बेशरम रंग' या गाण्यातील दीपिकाच्या बिकिनीतील भगवा रंग संत समाजासह राज नेत्यांनाही पसंत पडत नाही. पठाणांच्या माध्यमातून हिंदूंच्या भावना दुखावल्या जात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. संतप्त लोक तर 'पठाण'वर बहिष्कार टाकण्याची मागणी करत आहेत. एकीकडे लोक याला विरोध करत आहेत, तर दुसरीकडे काहींनी समर्थनही केले आहे.
शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणचा 'पठाण' या चित्रपटाच्या रिलीजची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. 'पठाण' हा चित्रपट तब्बल २५० कोटींच्या बजेटमध्ये बनला असून बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट चांगली कमाई करेल अशी अपेक्षा आहे. यापूर्वी वादग्रस्त ठरलेल्या बॉलिवूड चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. आता या वादातून 'पठाण'ला कितपत फायदा होणार हे पाहावे लागेल.