Join us

किंग इज बॅक! इतके दिवस कुठे गायब होतास? चाहत्याचा प्रश्न अन् शाहरूख खानचं भन्नाट उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2022 12:36 PM

Shah Rukh Khan, #AskSRK : ‘आस्क मी एनिथिंग’ सेशनमध्ये चाहत्यांनी शाहरूखला एकापेक्षा एक भारी प्रश्न केलेत. मग काय, चाहत्यांचे प्रश्न आणि शाहरूखची मजेशीर उत्तर असा ‘सिलसिला’ चांगलाच रंगला.

 #AskSRK : बॉलिवूडचा किंगखान शाहरूख खानने  (Shah Rukh Khan) काल बुधवारी आपल्या ‘पठान’ (Pathaan )  या चित्रपटाची रिलीज डेट जाहिर केली. टीझरही रिलीज केला. यानंतर काय तर सोशल मीडियावर ‘किंगखान’ ट्रेंड होऊ लागला. चाहते क्रेझी झालेत. चाहतांचा हा उत्साह पाहून शाहरूखला कदाचित राहावलं नाही आणि त्याने ट्विटरवर ‘आस्क मी एनिथिंग’ सेशन केलं. मग काय, चाहत्यांचे प्रश्न आणि शाहरूखची मजेशीर उत्तर असा ‘सिलसिला’ चांगलाच रंगला.

कहां गायब हो डिअर, फिल्मों में आते रहां, खबरों में नहीं..., असा प्रश्न एका चाहत्याने केला. यावर ‘ओके, पुढच्या वेळी खबरदार राहील,’ असं उत्तर दिलं.

आमिर खानचा ‘लालसिंग चड्ढा’ पाहिला का? असा सवाल एका चाहत्याने केला. यावर, ‘अरे यार, आमिर म्हणतोय की आधी पठान दाखवं...,’असं मजेशीर उत्तर एसआरकेने दिलं.

इतक्या दिवस कुठे गायब होतोस?यावर ख्यालों मे..., असं उत्तर शाहरूखने दिलं.

सर, अभ्यास कसा करू, मन लागत नाही?यावर, मेंदू ट्राय कर, कदाचित काम करेल आणि मनं प्रेमासाठी जपून ठेव, असं मजेशीर उत्तर शाहरूखने दिलं.

पठान या चित्रपटासाठी केस कसे वाढवलेत?या चाहत्याच्या प्रश्नावर शाहरूखने भन्नाट उत्तर दिलं. भाई, माझ्यासारखे केस असल्यावर वेळ लागत नाही. घर की खेती है ना, असं उत्तर त्याने दिलं.

 पुढीलवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर 25 जानेवारी 2023 रोजी ‘पठान’ रिलीज होतोय. हिंदीसोबतच तामिळ आणि तेलगू भाषेतही हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शाहरुख खानसोबत अभिनेत्री दीपिका पादुकोण  मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय अभिनेता जॉन अब्राहमची सुद्धा महत्त्वपूर्ण भूमिका आहे. शाहरुखचा 2018 मध्ये ‘झीरो’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात तो मुख्य भूमिकेत दिसला होता. पण या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही. त्यानंतर शाहरुखने कोणताही चित्रपट साइन केला नव्हता. 

टॅग्स :शाहरुख खानसिनेमाबॉलिवूड