Join us

​केवळ ५०० रूपये घेऊन मुंबईत आली होती दिशा पटनी!!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2018 4:47 AM

‘बागी2’च्या धमाकेदार ओपनिंगनंतर दिशा पटनी हिचा आनंद गगणात मावेनासा झाला आहे. पहिल्याचदिवशी बॉक्सआॅफिसवर २५.१० कोटी कमाई करून ‘बागी2’ने रेकॉर्ड ...

‘बागी2’च्या धमाकेदार ओपनिंगनंतर दिशा पटनी हिचा आनंद गगणात मावेनासा झाला आहे. पहिल्याचदिवशी बॉक्सआॅफिसवर २५.१० कोटी कमाई करून ‘बागी2’ने रेकॉर्ड केला आहे. गत तीन दिवसांत या चित्रपटात ७५ कोटींवर गल्ला जमवला आहे. साहजिकचं दिशा जाम आनंदात आहे. एकेकाळी केवळ ५०० रूपये घेऊन मुंबईत आलेल्या दिशासाठी हे यश खूप मोठे आहे. होय, दिशा केवळ ५०० रूपये घेऊन मुंबईत आली होती. अलीकडे एका मुलाखतीत दिशाने संघर्षाच्या त्या दिवसांबद्दल सांगितले. अभिनयाशिवाय काहीही करण्यात दिशाला रस नव्हता. अभिनेत्री बनण्याचे स्वप्न तिला स्वस्थ बसू देत नव्हते. याच स्वप्नापोटी तिने शिक्षण अर्धवट सोडले आणि केवळ हातात ५०० रूपये घेऊन मुंबईची वाट धरली. दिशा याबद्दल सांगते, माझ्यासारख्या एका नवख्या मुलीसाठी नव्या शहरात येणे सोपे नव्हते. मी रोज आॅडिशनसाठी पायपीट करत इकडे तिकडे फिरायची. सोबत खर्च भागवण्यासाठी वेगवेगळे जॉब. काम मिळाले नाही तर घराचे भाडे कसे चुकवणार, हा एकच प्रश्न त्यावेळी माझ्या मनात असायचा. ‘एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ याआधी मी दुसºयाच चित्रपटातून डेब्यू करणार होती. पण सगळे काही ठरल्यावर ऐनवेळी मला रिप्लेस केले गेले. कारण काहीही असो. पण त्या नकाराने मी आणखी मजबूत झाले. तुमच्यात एखादी कमतरता असेल तर ती दूर करण्यासाठी आणखी मेहनत करायला हवी, हे मी मनाशी ठरवून टाकले. त्याकाळात बरेच काही सोसले. पण घरच्यांची मदत घेतली नाही, असे दिशा म्हणाली.ALSO READ : ​दिशा पटनीला लागली अक्षय कुमारच्या चित्रपटाची लॉटरी; पण आहे एक अडचण!! बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्याआधी दिशाला ‘लोफर’ हा तेलगू सिनेमा मिळाला. यानंतर एका म्युझिक व्हिडिओत ती दिसली आणि यानंतर ‘एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ हा चित्रपट तिला मिळाली. ‘एम एस धोनी : दी अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटात दिशाने धोनीच्या पहिल्या प्रेयसीची भूमिका साकारली होती. या चित्रपटात ती सुशांत सिंह राजपूतच्या अपोझिट दिसली होती. तिच्या यातील अभिनयाचे प्रचंड कौतुक झाले होते. यापश्चात इंटरनॅशनल मेगास्टार जॅकी चॅनच्या चित्रपटाची लॉटरी दिशाला लागली. जॅकीच्या ‘कुंग फू योगा’मध्ये ती दिसली होती. ‘बागी2’ हा दिशाचा तिसरा सिनेमा.