आपल्या शहरात कोरोना व्हायरसमुळे झालेल्या मृत्यूने घाबरली बॉलिवूडची ही अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2020 03:38 PM2020-04-18T15:38:06+5:302020-04-18T15:53:43+5:30

ही गोष्ट फक्त एका व्यक्ती पुरती मर्यादित नाही.

Patralekha worried ove the death of corona in her city about her parents gda | आपल्या शहरात कोरोना व्हायरसमुळे झालेल्या मृत्यूने घाबरली बॉलिवूडची ही अभिनेत्री

आपल्या शहरात कोरोना व्हायरसमुळे झालेल्या मृत्यूने घाबरली बॉलिवूडची ही अभिनेत्री

googlenewsNext

अभिनेत्री पत्रलेखा गेल्या बुधवारी कोरोना व्हायरसमुळे मेघालयमधील झालेल्या मृत्यूला घेऊन चिंतेत आहे. मेघालयची राजधानी असलेल्या शिलांगमध्ये पत्रलेखाचे आई-वडील आणि भाऊ राहतात. 


पत्रलेखा म्हणते, ''माझे आई-वडील शिलांगमध्ये आहेत. जेव्हापासून तिकडे एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे मी खूप चिंतेत आहे. ही गोष्ट फक्त एका व्यक्ती पुरती मर्यादित नाही. कोरोना व्हायरस संक्रमित झालेला तो व्यक्ती किती लोकांच्या संपर्कात आला असले आणि त्यामुळे आणखी किती लोक संक्रमित झाले असतील. माझ्या आई-वडिलांसोबत भाऊ असल्यामुळे त्यांना सामान आणण्यासाठी बाहेर जावे लागत नाही. पण तरीही मला काळजी वाटते आहे.''  


पुढे ती म्हणते, ''आतापर्यंत वडिलांना कधीच घरी बसलेले बघितले नाही, रविवारसुद्धा ते कामात व्यग्र असतात. एखाद्या व्यक्ती ज्यावेळी कामात व्यस्त असते तेव्हा तिचा वेळ लगेच निघून जातो. मात्र ज्यावेळी तिच्याकडे करायला काही काम नसते तेव्हा फक्त तणाव वाढतो.'' 


पत्रलेखा या लॉकडाऊन दरम्यान बॉयफ्रेंड राजकुमार रावसोबत वेळ घालवित आहे.राजकुमार आणि पत्रलेखाचे कपल बॉलिवूडमध्ये आदर्श कपल म्हणून ओळखले जाते. या कपलने आपले नाते कधीच कुणापासून लपवले नाही. सोशल मीडियावर दोघेही एकमेकांसोबतचे फोटो सर्रास शेअर करतात. ते दोघे अनेक वर्षांपासून नात्यात आहेत. पत्रलेखाने हंसल मेहता यांच्या ‘सिटीलाईट्स’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. राजकुमार राव आणि पत्रलेखाची पहिली भेट एफटीआयआयमध्ये झाली होती. एका शॉर्टफिल्म्सच्या सेटवर दोघांमध्ये प्रेम बहरले असे म्हटले जाते. 

Web Title: Patralekha worried ove the death of corona in her city about her parents gda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.