तुम्ही काहीही न सांगता आम्हाला सोडून गेलात पापा...! अभिनेत्री पत्रलेखाच्या वडिलांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 10:05 AM2021-04-13T10:05:02+5:302021-04-13T10:05:29+5:30

Patralekhaa Father Passes away : पत्रलेखाने एक भावुक पोस्ट लिहिली आहे. तिची ही पोस्ट वाचून तुमचेही डोळे पाणावतील.

Patralekhaa Father Passes away share emotional post | तुम्ही काहीही न सांगता आम्हाला सोडून गेलात पापा...! अभिनेत्री पत्रलेखाच्या वडिलांचे निधन

तुम्ही काहीही न सांगता आम्हाला सोडून गेलात पापा...! अभिनेत्री पत्रलेखाच्या वडिलांचे निधन

googlenewsNext
ठळक मुद्देगेल्या अनेक वर्षांपासून पत्रलेखा राजकुमार रावसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.

बॉलिवूड अभिनेत्री आणि अभिनेता राजकुमारची (Rajkummar Rao) गर्लफ्रेन्ड पत्रलेखा (Patralekhaa) पित्याच्या आठवणीने व्याकुळ झाली आहे. नुकतेच पत्रलेखाच्या वडिलांचे निधन झाले. यानंतर पत्रलेखाने एक भावुक पोस्ट लिहिली आहे. तिची ही पोस्ट वाचून तुमचेही डोळे पाणावतील. या पोस्टनंतर तिचे अनेक सहकलाकार, मित्रमंडळी आणि चाहत्यांनी तिचे सांत्वन केले आहे. (Patralekhaa Father Passes away

पोस्टमध्ये ती म्हणते, ‘मी चिडले आहे, मी नाराज आहे. माझ्याकडे शब्द नाहीत. ही वेदना काळीज चिरणारी आहे. तुम्ही काहीही न सांगता आम्हाला सोडून गेलात पापा... मी तुमच्यावर खूप प्रेम करते. मी कायम तुमचा भाग असेल आणि तुम्ही सतत आमच्या सोबत असाल. मी तुमचा अभिमान बनू शकेल, याची मला आशा आहे. आम्हाला हे सुंदर आयुष्य दिल्याबद्दल आभार. आम्ही सुखात जगू शकू यासाठी तुम्ही अपार कष्ट घेतलेत. तुम्ही एक उत्तम पिता, एक उत्तम पती होते. तुम्हाला तुमच्या कामाबद्दल प्रेम होते. तुमचे सगळे मित्र मला सांगताहेत, की तुम्ही किती प्रेमळ, किती सच्चे होतात. सी यू पापा... लव्ह यू...’

तिच्या या पोस्टवर बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनीही कमेंट केल्या आहेत़. आम्ही तुझ्या दु:खात सहभागी असल्याचे अभिनेत्री भूमी पेडणेकरने म्हटले आहे. तर अभिनेत्री सोनम कपूरनेही या प्रसंगी कमेंट करत दु:ख व्यक्त केले आहे. डायना पेंटी, साकीब सालेम, आदिती राव हैदरी अशा अनेक कलाकारांनी तिचे सांत्वन केले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून पत्रलेखा राजकुमार रावसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. या कपलने आपले नाते कधीच कुणापासून लपवले नाही. सोशल मीडियावर दोघेही एकमेकांसोबतचे फोटो सर्रास शेअर करतात. ते दोघे अनेक वर्षांपासून नात्यात आहेत. पत्रलेखाने हंसल मेहता यांच्या ‘सिटीलाईट्स’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. राजकुमार राव आणि पत्रलेखाची पहिली भेट एफटीआयआयमध्ये झाली होती. एका शॉर्टफिल्म्सच्या सेटवर दोघांमध्ये प्रेम बहरले असे म्हटले जाते.  

Web Title: Patralekhaa Father Passes away share emotional post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.