Join us  

​या स्टार्सच्या बाताच देशभक्तीच्या: मतदानाला पाठ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2017 3:23 PM

बॉलिवूड सेलिब्रेटीसच्या मागे असलेल्या वलयामुळे त्यांच्या अनेक गोष्टींचे अनुकरण केले जाते. आपण जनजागृती करण्यात आघाडीवर आहोत हे दाखवायला देखील ...

बॉलिवूड सेलिब्रेटीसच्या मागे असलेल्या वलयामुळे त्यांच्या अनेक गोष्टींचे अनुकरण केले जाते. आपण जनजागृती करण्यात आघाडीवर आहोत हे दाखवायला देखील हे स्टार्स मागे नसतात. देशभक्तीच्या नावावर अनेक गोष्टींचे समर्थन करणारे स्टार्स मात्र आपला मतदानाचा मूलभूत अधिकार बजावला नाही. आशिया खंडातील सर्वांत मोठ्या महानगर पालिकेच्या निवडणुकीत याच शहरात राहणाºया बड्या सेलिब्रेटींनी वोट केले नाही. स्वप्नाचे शहर म्हणून उल्लेख केल्या जाणाºया मुंबई शहरातील महानगर पालिकेच्या निवडणुकसाठी मतदान पार पडले. अनेक मोठ्या स्टार्सनी आपला मतदानाचा हक्क बजावला, पण अनेक सेलिब्रेटींनी आपल्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्यामुळे मतदान करता आले नाही. यात अजय देवगन, आमिर खान, हृतिक रोशन, अनुपम खेर, ऋषि कपूर, जावेद अख्तर आणि शबाना आझमी, अर्जुन कपूर, संजय दत्त, इमरान हाश्मी, दिया मिर्जा, कंगना राणौत, प्रियंका चोप्रा, सैफ अली खान यांचा समावेश आहे. यात अक्षय कुमारचे नाव देखील घेता येते. मात्र मुंबईच्या मतदार यादीत अक्षयचे नाव आहे किंवा नाही हे अद्याप समजू शकले नाही. अक्षय कुमार भारताचा नागरिक आहे किंवा नाही हे सांगता येत नाही. हे सर्व कलावंत शूटिंगसाठी मुंबईच्या बाहेर आहेत. अजय देवगन व इमरान हाश्मी जोधपूरमध्ये आहेत. आमिर खान व हृतिक रोशन बाहेरगावी आहेत. ऋषि कपूर हांगकांगमध्ये आहेत. जावेद अख्तर व शबाना आझमी बेंगलुरूमध्ये आहेत, अर्जुन कपूर लंडनमध्ये, संजय दत्त आग्रात, सैफ अली खान व कंगना राणौत दिल्लीत, अक्षय कुमार भोपाळमध्ये तर प्रियांका चोप्रा अमेरिकेत आपल्या कामात व्यस्त आहे. फोटो : बॉलिवूड लाईफ दुसरीकडे अनेक बॉलिवूड सेलिबे्रटींनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदान केल्यानंतर सोशल मीडियावर आपल्या फ ोटो शेअर केल्या, काहींनी मतदान केंद्रावर मीडियाला पोझ दिले. यात रणवीर सिंग, हेमा मालिनी, अनुष्का शर्मा, श्रद्धा कपूर, सुभाष घई, जॉन अब्राहम, परेश रावल, वरुण धवन, कैलाश खेर, श्रुति सेठ, किरण राव यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. प्रसिद्ध गीतकार व चित्रपट निर्माते गुलजार यांनी मीडियाशी संवाद साधला ते म्हणाले, मुंबईत मोठ्या संख्येने युवक मतदान करीत आहेत. येणारी पिढी जागरुक असल्याचे यावरून दिसते. ज्या समस्या आहेत त्या निवडणुकीनंतर सुटतील अशी आशा क रूया. फोटो : बॉलिवूड लाईफ