Join us

'मैं अटल हूं' सिनेमात सोनिया गांधींची भूमिका कोणी साकारली? मराठी सिनेसृष्टीशी खास कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2024 4:14 PM

१९ जानेवारी २०२४ रोजी मै अटल हूं सिनेमा सर्वत्र प्रदर्शित केला जाणार आहे.

भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित 'मैं अटल हूं'  हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.  या सिनेमातबॉलिवूडचे लोकप्रिय अभिनेते पंकज त्रिपाठी हे अटल बिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेत दिसणार आहेत.  त्यात विशेष लक्ष वेधलं आहे, ते सोनिया गांधी यांच्या भूमिकेत असलेल्या अभिनेत्रीनं. या अभिनेत्रीचं मराठी सिनेसृष्टीशी खास कनेक्शन आहे. 

'मैं अटल हूं'  चित्रपटात सोनिया गांधींची भूमिका साकारणारी अभिनेत्री ही दुसरी तिसरी कोणी नाही. तर पॉला मॅग्लिन आहे. पॉलाचे मराठी सिनेसृष्टीसोबत खास कनेक्शन आहे.  वेब विश्वात 'बबू' म्हणून लोकप्रिय असणारा सारंग साठ्ये तिचा लाइफ पार्टनर आहे. पॉला ही भाडिपा या मराठी सीरिज व कंटेट बनवणाऱ्या लोकप्रिय युट्यूब चॅनेलची संस्थापक आहे.  यापूर्वी तिने भाडिपाच्या अनेक मराठी सीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. सिनेमातील पॉलाचा लूक पाहून प्रेक्षकांची या चित्रपटाबाबत उत्सुकता वाढली आहे.

सारंगने जेव्हा पॉलाला आपली लाइफ पार्टनर म्हणून निवडले. तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. कारण, सारंग हा अस्सल पुणेरी तर पॉला कॅनडाची आहे. सारंगने एका मुलाखतीत सांगितले होते की, 'टोरँटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये माझा एक चित्रपट होता, याच फेस्टिव्हलमध्ये पॉलाची शॉर्ट फिल्म होती'.

'त्यानंतर आम्ही कामानिमित्त भेटू लागलो. एका चित्रपटावर आम्ही एकत्र काम केले. हे करत असताना आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो'.  त्यानंतर त्या दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. मग ते पुण्यात राहू लागले. याआधी मी घरी आई वडिलांना आमच्या नात्याविषयी सांगितले. घरच्यांच्या मान्यतेनंतर गेली आठ वर्षे एकत्र राहत आहोत', असे सारंगने सांगितले होते.

१९ जानेवारी २०२४ रोजी 'मैं अटल हूं' सिनेमा सर्वत्र प्रदर्शित केला जाणार आहे. पंकज त्रिपाठींचा 'मै अटल हूं' सिनेमाची घोषणा गेल्या वर्षी करण्यात आली होती. डिसेंबर २०२३ मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती.

टॅग्स :सेलिब्रिटीमराठी अभिनेताबॉलिवूडसिनेमासोशल व्हायरल