@ChopraLover@1lovePC that lying bastard spent time in jail...his old mother and father fell at Pc's feet begging forgiveness. ...
पीसीने तोडली चुप्पी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2016 11:59 PM
आपली पीसी अर्थात प्रियंका चोपडा हिने बॉलिवूडमधील संघर्षाच्या काळात तीनदा आत्महत्येचे प्रयत्न केले होते, असा दावा प्रियंकाचा माजी मॅनेजर ...
आपली पीसी अर्थात प्रियंका चोपडा हिने बॉलिवूडमधील संघर्षाच्या काळात तीनदा आत्महत्येचे प्रयत्न केले होते, असा दावा प्रियंकाचा माजी मॅनेजर प्रकाश जाजू याने केला होता. या बातमीवर पीसीने आत्तापर्यंत चुप्पी साधली होती. मात्र आता पीसीने यावर खुलासा करीत, प्रकाश जाजूची कुठलीही विश्वासार्हता नसल्याचे म्हटले आहे. ज्या व्यक्तिची कुठलीही विश्वासार्हता नाही, अशा व्यक्तिवर मीडियाने जराही विश्वास ठेवू नये, असेही प्रियंकाने स्पष्ट केले आहे. जी व्यक्ति माझ्या तक्रारीवरून तुरुंगात गेली आहे,अशा व्यक्तिवर मीडिया विश्वासच कसा ठेऊ शकते, हेच मला कोडे वाटते. ज्या व्यक्तिची कुठलीही विश्वासार्हता नाही, तिने काहीही दावे केले तरी मला फरक पडत नाही, असे पीसी म्हणाली....................................................प्रियंकाची आई म्हणाली,‘वो झूठा है’बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोपडा हिने एकदा नव्हे तीनदा आत्महत्येचे प्रयत्न केले होते, हा प्रकाश जाजू याचा दावा प्रियंकाची आई मधू चोपडा यांनी खोटा ठरवला आहे. प्रकाश जाजू हा प्रियंकाचा कधीकाळचा मॅनेजर आहे. प्रियंका आपल्या संघर्षाच्या काळात अतिशय हळवी होती. तिने तीनदा आत्महत्येचे प्रयत्न केले होते, असा दावा त्याने काल टिष्ट्वटरवरून केला होता. प्रियंका सध्या आपल्या हॉलिवूड प्रोजेक्टमध्ये पुरती बिझी आहे. त्यामुळे तिने जाजूच्या या दाव्यांवर कुठलाही खुलासा वा स्पष्टीकरण दिलेले नाही. मात्र प्रियंकाची आई मधू यांनी मात्र टिष्ट्वटरवर जाजूचे सगळे दावे खोडून काढले आहेत. ‘तो खोटारडा आहे. तुरुंगात जावून आलेला आहे. त्याची म्हातारी आई आणि बाबाने प्रियंकाच्या पाया पडून माफी मागितली...’असे टिष्ट्वट मधू यांनी केले आहे. ................................................प्रियंकानेही केला होता आत्महत्येचा प्रयत्न!प्रत्युषा बॅनर्जीच्या आत्महत्येने संपूर्ण टीव्ही इंडस्ट्री धक्क्यात असताना, आजची आघाडीची अभिनेत्री प्रियंका चोपडा हिच्याबद्दल धक्कादायक बाब समोर आली आहे. प्रियंकाने आपल्या स्ट्रगल काळात आत्महत्येचा प्रयत्न केला होता, असा दावा प्रियंकाचा माजी मॅनेजर प्रकाश जाजू याने केला आहे. केवळ एकदा नाही तर तिनदा प्रियंकाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे जाजूने म्हटले आहे. एका पाठोपाठ एक असे टिष्ट्वट करून जाजूने हा दावा केला. आजघडीला प्रियंका इंटरनॅशनल स्टार बनली आहे. पण बॉलिवूडमधील स्ट्रगल करताना एका क्षणाला ती कोलमडली होती. आज ती स्ट्राँग दिसत असली तरी संघर्षाच्या दिवसात अतिशय हळवी होती. दोन-तीनदा तिने आत्महत्येचा प्रयत्न केला पण मी कसेबसे तिला यापासून परावृत्त केले, असे जाजूने म्हटले आहे. जाजूने प्रियंकाचा कथित ब्रॉयफ्रेन्ड असीम मर्चेंट याचाही उल्लेख केला आहे. असीमच्या आयुष्यात अनेक मुली होत्या. प्रियंका यामुळे तणावात राहायची व त्याला रात्रीबेरात्री फोन करायची. एकदा असीमसोबत भांडल्यानंतर प्रियंका आत्महत्या करण्याच्या इराद्याने मुंबईच्या वसई भागात पोहोचली होती. मी अनेक प्रयत्नांनी प्रियंकाची असे न करण्याबद्दल समजूत काढली,अशी माहितीही जाजूने एका टिष्ट्वटद्वारे दिली आहे. प्रियंका असीमच्या आईच्या खूप जवळची होती. २००२मध्ये असीमच्या आईचे निधन झाल्यानंतर प्रियंका मनातून पार कोसळली आणि तिने एका अपार्टमेंटच्या खिडकीतून उडी घेण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर या खिडकीला लोखंडाचे ग्रील लावले गेले. तोपर्यंत प्रियंकाला अक्षरश: खुर्चीला बांधून ठेवले गेले होते, असेही एक टिष्ट्वट जाजूने केले आहे. तूर्तास प्रियंका व प्रकाश जाजू यांचे संबंध पुरते बिघडले आहेत. काही मतभेदानंतर प्रियंकाने जाजूसोबतचा करार संपुष्टात आणला होता. २००८ मध्ये प्रियंकाच्या वडिलांनी जाजूविरूद्ध तक्रार दाखल करीत, जाजू आपल्या मुलीच्या व्यक्तिगत आयुष्यात ढवळाढवळ करीत असल्याचा आरोप केला होता. या तक्रारीनंतर जाजूला ६८ दिवस तुरुंगात घालवावे लागले होते. यापूर्वीही जाजूने प्रियंकाबद्दल असे अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.