Join us

" गलीबॉय'मुळे लोक मला..." सिनेसृष्टीतील यशावर पहिल्यांदाच व्यक्त झाला अभिनेता विजय वर्मा 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2024 3:31 PM

अभिनेता विजय वर्मा हे मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध असं नाव आहे. 

Vijay Varma: 'गल्लीबॉय', 'डार्लिंग', 'जानेजान', 'दहाड़' यांसारखे सिनेमे तसेच वेबसिरीजमधून काम करत अभिनेता विजय वर्मा प्रकाशझोतात आला. मनोरंजन विश्वात चाहत्यांच्या मनावर त्याने आपल्या अभिनयाची छाप उमटवली. दमदार अभिनयाच्या जोरावर विजय वर्मा आजही प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. पण इथपर्यंतचा त्याचा प्रवास फार काही सोपा नव्हता. प्रचंड मेहनत करुनही त्याच्या अभिनयाची दखल घेतली जात नव्हती. 

नुकत्याच एका मुलाखतीत अभिनेत्याने त्याच्या संघर्षाच्या काळावर भाष्य केलंय. आपल्या करिअरमध्ये आलेल्या अडचणीवर त्याने प्रकाश टाकला आहे.'रंगरेज', 'गैंग्स ऑफ घोस्ट्स', 'पिंक', 'मानसून शूटआउट', 'मंटो' यांसारख्या चित्रपटांमध्ये छोट्या छोट्या भूमिका साकारल्या तरी यश काही पदरी पडत नव्हतं. त्याच दरम्यान २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'गलीबॉय' सिनेमात विजयने छोटंस पात्र साकारलं आणि तो समिक्षकांच्या नजरेत आला. त्याआधी विजय वर्माने खूप ट्रायल्स दिल्या त्यानंतर अभिनेत्याला 'गली बॉय' मध्ये काम करण्याची संधी मिळाली.

विजयने २०१२ मध्ये 'चित्तागोंग' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. विजयने पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया येथून अभिनयाचे शिक्षण घेतले होते. याशिवाय रंगरेज, गँग ऑफ घोस्ट, पिंक, राग देश, गली बॉय यांसारख्या चित्रपटांतील कामासाठी तो ओळखला जातो. 'मिर्झापूर' या वेब शोमध्ये काम करून विजयने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. 

टॅग्स :बॉलिवूडसेलिब्रिटी