Join us

Video : मदतीची आस! सोनू सूदच्या घराबाहेर लोकांची गर्दी; नेटकरी म्हणाले, हाच पंतप्रधान हवा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2021 11:13 AM

व्हिडीओ पाहून नेटकरी सोनूवर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. अनेकांनी तर सोनूला पंतप्रधान करा, अशी मागणी केली आहे.

ठळक मुद्देतूर्तास सोनूच्या घराबाहेरचा लोकांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. काही तासांत 7 लाखांवर लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. 

कोरोना काळात लोकांसाठी देवदूत बनलेला अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) दिवसरात्र खपतोय. कोरोनाची पहिली लाट आली तेव्हा सोनू सूदने स्थलांतरित मजुरांना मदतीचा हात दिला. त्यांना सुरक्षित त्यांच्या घरी पोहोचवले. कोरोनाच्या सध्याच्या महाभयंकर लाटेत सोनू लोकांचे जीव वाचवताना दिसतोय. देशात ऑक्सिजन आणि बेड्सचा प्रचंड तुटवडा आहे. अशास्थितीत सोनू व त्याची टीम गरजू रूगणांना आॅक्सिजन पुरवण्याचे, बेड्स उपलब्ध करून देण्याचे काम करतोय. आता तर ऑक्सिजन व बेड्ससाठी वणवण भटकत असलेल्या कोरोना रूग्णांच्या नातेवाईकांनी सोनू सूदच्या घरासमोर गर्दी करणे सुरू केले आहे. (people gather outside Sonu Sood residence in huge numbers for help)

मुंबईत लॉकडाऊन आहे. पण अशास्थितीत लोक सोनूच्या घराबाहेर मदतीच्या प्रतीक्षेत गर्दी करत आहेत. सोनूकडे नक्की मदत मिळेल, या आशेने काही लोक त्याच्या घरी पोहोचले. सोनूने या लोकांना निराश न करता, त्यांच्या समस्या ऐकून घेत त्यांना मदतीचे आश्वासन दिले. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

मदतीच्या आशेने आलेले हे लोक सोनूला आशीर्वाद देतानाही दिसत आहेत. आम्हा सर्वांचे आशीर्वाद व प्रार्थना तुमच्यासोबत आहेत सर, देव तुमचे भले करो, अशा शब्दांत हे लोक सोनूला आशीर्वाद देत आहेत.तूर्तास सोनूच्या घराबाहेरचा लोकांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. काही तासांत 7 लाखांवर लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी सोनूवर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. अनेकांनी  तर सोनूला पंतप्रधान करा, अशी मागणी केली आहे.

टॅग्स :सोनू सूद